सावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सुरेश कन्नमवार यांची मागणी!
सावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सुरेश कन्नमवार यांची मागणी!
सावली (प्रतिनिधी)
सावली तालुक्यात सतत होत असलेल्या अतिव्रुष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे व सर्वसामान्य नागरिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.सततच्या पावसामुळे शेतातील धान व पिकांचे मोठे नुकसान झाले असुन येथिल शेतकरी हवालदिल झाला आहे. नदि काठावरिल उभी पिके काही वाहुन गेली तर काही नासाडी झाली आहेत ग्रामिण भागातील घरांची पडझड होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.एवढेच नव्हे तर धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पुरस्थितीचा सामना करावा लागत आहे.नदिकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसत असुन नागरिकांना दररोज पुराच्या भितीने झोप उडाली आहे. शेतातील उभी शेतपिके अतिवृष्टीमुळे खराब होत असुन यावर्षी उत्पन्न खर्चापेक्षा कमी उत्पन्न होण्याची शक्यता आहे.अशा परिस्थीतीत तालुक्यातील एकंदर परिस्थीतीचा आढावा घेऊन ग्रामिण शेतकरी जनतेला प्रशासकीय स्तरावरुन दिलासा देण्यात यावा व सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक संकटापासुन शेतकऱ्यांना वाचवावे अशी मागणी सुरेश कन्नमवार यांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!