जिल्हा परिषद सदस्य एड. लालसू नोगोटी यांची पूरग्रस्त गावांना भेट .
अहेरी (सेवा पवार)
दिनांक 11 सेप्टेम्बर रोजी भामरागड तालुक्यातील पूरग्रस्त गुंडूरवाही व पोयरकोठी या गावांना भेट देऊन तेथील पूरग्रस्त लोकांचे समस्या जाणून घेतले. रात्री अचानक पूर आल्यामुळे लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. काही घर जमीनदोस्त झाले. अचानक पूर आल्यामुळे लोकांनी आपले सामान जिथे होते तिथे ठेवून अक्षरशः घर सोडून पळून गेले. वापरायचे कपडेसहित सर्व सामान पूराच्या पाण्यात वाहून गेले. भांडीही वाहून गेले. कोंबड़े, बकरे, डूक्कर हे आदिवासी समाजाची मालमत्ता समजली जाते. तेही वाहून गेले. ज्यांचे सर्व काही वाहून गेला ते गावकऱ्यांच्या मदतीने उदरनिर्वाह करीत आहेत.
सर्वे करण्यासाठी आलेली टीम अजूनही या गावात न पोहचल्यामुळे लोकांना अजूनही कोणतीही शासनाची मदत मिळाली नाही. लोकांच्या पीकाचेही खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. लोकांपुढे पुढील एक वर्षाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणुन पूरपीडितांची सर्वे करून त्यांना त्वरित मदत करण्याचे आवाहन जिल्हा परिषद एड. लालसु नोगोटी यांनी केले आहे.
दरम्यान एड. लालसू नोगोटी यांनी गुंडूवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगनवाड़ी केन्द्राला भेट दिली. त्या ठीकानी पूरामुळे सर्वत्र घाण व दुर्गंधी असल्यामुळे गावातील शिक्षक व गावकऱ्यांना गावात स्वछता राखण्याचेही आवाहन लालसु नोगोटी यांनी केले. संस्था, संघटना व शासनातर्फे केली जाणारी मदत लवकरच आपल्यापर्यंत पोहचवली जाईल असे गावकऱ्यांशी बोलतांना एड. लालसू नोगोटी यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!