चिमुकले बनले शिक्षक

चिमुकले बनले शिक्षक


सावली  (प्रतिनिधी)
 सावली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंबर 2 येथे शिक्षक दिनानिमित्त चिमुकले बनले  शिक्षक.
5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस  शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यानिमित्त प्रत्येक शाळा,  महाविद्यालयामध्ये हा दिवस स्वयंशासन म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक बनवून  साजरा करण्यात येतो.  यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याबरोबरच शिक्षकाची जबाबदारी काय आहे यातून विद्यार्थ्यांना प्रत्ययास आणून दिली जाते.  त्यामध्ये चिमुकले सुद्धा शिक्षकाची भूमिका करताना मोठ्या उत्साहात शाळेमध्ये शिकवितात. 
सावली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंबर 2 येथे शिक्षक दिनानिमित्त एक दिवस का होईना चिमुकल्यानी शिक्षक बनून शिक्षक दिन साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!