सावली पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी,दोन आरोपीना अटक एक फरार सत्तर हजार रुपयांची दारू साठा जप्त
सावली पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी,दोन आरोपीना अटक एक फरार सत्तर हजार रुपयांची दारू साठा जप्त
सावली (सुरेश कन्नमवार)
गोपनीय माहितीच्या आधारे खाती मोहल्ला येथील नामे, राहुल उर्फ मुन्ना मोहूरले यांच्या राहते घराजवळील पडक्या घराचे बाजूला असलेल्या सांदवाडीत अवैध्यरीत्या देशी दारू लपवून ठेवलेली असल्याचे माहिती चे आधारे त्याला व त्याच्या सोबत असलेल्या नामे स्वप्नील धर्मापवार
यांना सोबत घेऊन नमुद ठिकाणाची पंचासमक्ष पाहणी केली असता. त्यात ४ प्लास्टिक चुंगळ्यात एकूण ७०० नग ९० एम.एल. देशी दारूने भरलेल्या राँकेट संत्रा कंपनी सीलबंद निपा प्रती निप १००/- रु एकूण किंमत ७०.०००/ - चा माल अवैध्यरीत्या मिळून आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून ताब्यात घेतला.नमूद कार्यवाहीत
आरोपी नामे, स्वप्नील प्रकाश धर्मापवार, राहुल मुन्ना रतन मोहूरले पाहिजे आरोपी, रोशन परशुराम भेंडारे तिन्ही खाती मोहला,सावली ता.सावली जिल्हा,चंद्रपूर यांचेवर पो.स्टे.ला गुन्हा नोंद करण्यात आला.असून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.व एक आरोपी गुन्हात फरार आहे.सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक, बाळासाहेब खाडे सा. यांच्या नेतृत्वात पोहवा, केवलराम उईके, पोशि, सुमित मेश्राम, पोशि,प्रफुल आडे,पोशि,नरेश डाहुले,पोशि,दिपक डोंगरे,मपोशि,प्रिती अलाम ,यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक, बाळासाहेब खाडे सा.यांचे मार्गदर्शनात सावली पोलीस करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!