शिवरा येथील भारत वाघमारे यांचे घर सततधार येत असलेल्या पावसामुळे कोसळले
शिवरा येथील भारत वाघमारे यांचे घर सततधार येत असलेल्या पावसामुळे कोसळले
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील शिवरा येथील भारत खटुजी वाघमारे यांचे घर सततंधार येत असलेल्या पावसामुळे कोसळले आहे .
चंद्रपूर जील्ह्यात सध्या ओल्या दुष्काळाची परीस्थीती नीर्माण झाली आहे . सतत दोन महीने झाले तरी पाऊस येत आहे . पाण्यामुळे कापुस, धान पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .त्याचप्रमाणे अनेक घराची पडझड चिमूर तालुक्यात होत आहे . १३ सप्तेबंरच्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान शीवरा येथील भारत खटुजी वाघमारे यांचे घर अचानक कोसळल्याने ऐनवेळेवर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे . त्यांना राहण्यासाठी घर सुध्दा राहीले नाही . त्यांनी सध्यपरीस्थीतीत एक झोपडी बांधुन राहत आहेत . एक दुचाकी सुध्दा या घराच्या मलब्यात दबली आहे . त्या दुचाकीचे सुध्दा नुकसान झाले आहे . तसेच मोठ्या प्रमाणात जीवनाश्यक वस्तुची नुकसान झालेली आहे .
त्यांना शासन नीर्णयानुसार मदत व घरकुल देण्यात यावे अशी मागणी क्षतीग्रस्त कुटुंब करीत आहेत .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!