सफाई महिलेस कामावरून काढले. वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा प्रताप.
शासकीय जीआर नुसार वेतन वाढ मागणाऱ्या सफाई महिलेस कामावरून काढले.
महिला आवडत नसल्याने काढल्याचा महिला अधिकाऱ्याचा दावा.
चंद्रपूर, (प्रतिनिधी)
प्रशासकीय भवनातील वरिष्ठ भु वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयात गेल्या वीस वर्षांपासून अल्प मानधनावर सेवा देणाऱ्या अनुसूचित जातीच्या सफाई कामगार महिलेस अचानक कामावरून काढून टाकले.
शासनाने नवीन जीआर काढून मानधनात मोठी वाढ केली ती इतर कार्यालयात लागू झाली हीच मलाही मिळावी, एवढी माफक अपेक्षा घेऊन गेलेल्या महिला सफाई कामगारास आपली नोकरी गमवावी लागली. या संदर्भात कार्यालय प्रमुख अधिकारी डॉ. वैजयंती सोलंकी यांना विचारणा केली असता, सौ. शशिकला वाळके ही महिला सफाई कामगार आपणास पसंत नसल्याचे सांगून, नव्या वादास वाव दिला आहे.विशेष असे की, या अधिकारी चा नांदेड जिल्ह्यातील कारभार सुद्धा असाच वादग्रस्त राहिला होता.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बंगाली कॅम्प निवासी सौ. शशिकला वाळके (५५)या सादर कार्यालयात गेल्या 20 वर्षांपासून सेवारत आहेत. तत्कालीन अधिकारी श्री. भट, बापट, कुहेकर, कांबळे, वालदे, रथकँठीवार आणि श्री. बैस यांनी वेळोवेळी त्यांच्या कामाची प्रशंसा करून आपल्या स्तरावर मानधन वाढ देण्याची शिफारसी केल्या होत्या. दरम्यान शासनाने नुकताच एक जीआर काढून मानधनात मोठी वाढ केली. चंद्रपुरात ती जिल्हा परिषद, कोषागार कार्यालय अशा अनेक कार्यलयांनी स्वीकारली. हाच न्याय मलाही मिळावा म्हणून सौ. वाळके यांनी आपल्या कार्यालय प्रमुखांना जीआर सह अर्ज केला. सहायक कामगार आयुक्त यांना तसे कळविले आणि पालकमंत्री महोदयांना महितीस्तव सादर केले.
हे जिव्हारी लागल्या सारखे करत कार्यालय प्रमुख अधिकारी सोलंकी यांनी उद्या पासून माझ्या कार्यालयात यायचे नाही. तू मला आवडत नाही, मी पोलिसात तक्रार देईल अशी धमकी दिली.धमकीच्या दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे कामगार महिला सौ.वाळके या आपले काम करत असतानाच सोलंकी मॅडम ऑफिसात आल्या आणि तू आताच्या आता इथून निघ, तू मला आवडत नाही म्हणून अधिकारी सोलंकी या एक-दोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांना घेऊन थेट रामनगर ठाण्यात गेल्या. तिथे त्यांनी मौखिक तक्रार केली असता सौ. वाळके सुद्धा ठाण्यात गेल्या. सफाई कामगार वाळके नी आपली बाजू मांडली असता पोलिसांनी अधिकार्यास समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही असे दिसताच पोलिसांनी हात जोडले आणि पीडित कामगार वाळके यांना नागपूर येथील वरिष्ठ कार्यालय किंवा कोर्टातून न्याय मागण्याचा सल्ला दिला.
खरं म्हणजे वाळके या अनुसूचित जातीच्या असल्याने अधिकारी सोलंकी यांना आवडत नाही आहेत. जातीय द्वेष भावना असल्याने 20 वर्ष सेवा दिलेल्या वाळके यांना डावलून दुसऱ्या कामगारास घेण्याचा घाट सोलंकी यांनी चालविलेला आहे. नांदेड जिल्ह्यात सुद्धा अशीच मुक्ताफळे या अधिकाऱयांनी उधळली असून तेथेही त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. दरम्यान सफाई महिला कामगार सौ. वाळके यांना न्याय देण्यास आता कर्मचारी संघठना पुढे आली असून न्याय न मिळाल्यास, पगारवाढी सह पुन्हा वाळके यांना कामावर न घेतल्यास आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे.
मंत्र्यांच्या पीए शी उद्धटपणा!
या सोलंकी मॅडम चा आणखी एक प्रताप पुढे आला असून थेट राज्याच्या वित्त व नियोजन मंत्र्यांच्या पीए ला सुद्धा उद्धट शब्दात बोलून त्यांचा अवमान केल्याचा प्रकार बोलला जात आहे. वाळके यांना न्याय देण्याची विनंती करणाऱ्या धमानगे यांच्याशी उद्धट आणि खड्या आवाजात बोलून आपल्या मुजोरपणाचे तारे तोडणार्या या अधिकार्यास धडा कोण शिकवेल? असा प्रश्न आता पुढे येत आहे.



उत्तर द्याहटवा