चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले अभ्यासू पोलीस अधीक्षक
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक देण्याची केली होती मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि जनाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक देण्याची मागणी केली होती. आज त्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. आयुष नोपानी (IPS) यांची चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. आयुष नोपानी यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याला अभ्यासू, शिस्तप्रिय आणि जनतेशी संवाद साधणारे अधिकारी लाभले आहेत. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होत, नागरिकांप्रती संवेदनशील, तत्पर आणि विश्वासार्ह पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा दृढ विश्वास आहे.
श्री. आयुष नोपानी यांचे चंद्रपूर जिल्ह्यात मनस्वी स्वागत व पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!