वटवृक्षारोपणाने केले गणपती विसर्जन

वटवृक्षारोपणाने केले गणपती विसर्जन


मूल   (अमित राऊत)
   झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली सोयरे वनचरे वृत्ती प्रमाणे मुत्यलवार परीवाराने एकदिवसीय गणपती विसर्जन करतांना वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. 
   मूलचे मुत्यलवार परीवार नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेत असतात. सतत पिढी न पिढी वृक्षांवर प्रेम करीत आली आहे. 2 तारखेपासुन गणपती अनेकांच्या घराघरात विराजमान झाले आहे. त्याचप्रमाणे मूल येथिल मुत्यलवार परीवाराने दरवर्षी प्रमाणे आपल्या घरी एक दिवसीय गणेशाची स्थापणा केली. गणतीचे विसर्जन करतांना वृक्षाचे महत्व सांगत मूलच्या तलावाजवळच वडाचे झाड जाऊन लाडक्या गणपत्ती बाप्पाला निरोप देण्यात आला.


    राज्याचे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे लाडक्या उपक्रमाचे मुत्यलवार परीवार नेहमीच कौतुक करीत असुन वनमंत्री मुनगंटीवारांच्या झाडे लावण्याच्या उपक्रमात सहभागी होत असतात. 
   लाडक्या गणपत्ती बाप्पाला निरोप देतांना व वडाचे वृक्षारोपण करतांना मुत्यलवार परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. आगळे वेगळे उपक्रम राबवित असल्याने मुत्यलवार परीवाराचे नागरीकांनी कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!