राष्ट्रीय पोषण आहार दिनानिमित्त पोषण रॅलीचे आयोजन

राष्ट्रीय पोषण आहार दिनानिमित्त पोषण रॅलीचे आयोजन


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमूर,राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त आज दिनांक. ३ सप्टेंबर ला एकात्मिक बाल विकास सेवा योजना चिमूर अंतर्गत आज पंचायत समिती कार्यलयापासून  अंगणवाडी सेविका व मदतनीस च्या मार्फतने पोषण रॅलीचा आयोजन करण्यात आले होते सदर पोषण आहार मासिक योजनेबद्दल विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. मुलांचा आणि स्त्रियांचा आहार कसा असावा, याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सेविका व मदनिस यांना पोषण आहार बद्दल माहिती दिली.


राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणजे आहाराबाबतची जागृती. आपल्याकडे कुपोषण म्हणजे फक्त ग्रामीण किंवा आदिवासी भागातील मुले कुपोषित आहेत, असे समजले जाते. कुपोषण म्हणजे चुकीचा आहार. आज शहरी मुलांमध्ये दिसणारा लठ्ठपणा म्हणजेही कुपोषणच. या आहाराबाबतच समाजाच्या विविध घटकांमध्ये जागृती करण्यासाठी राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचे आयोजन केले जाते. 
मा.मुदखेडे साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडी मध्ये विविध पोषण आहार जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!