पळसगाव (पि) गावामध्ये पूर परिस्थिती गोंडमोहाळी ग्रामवासीयांनी घडविले माणुसकीचे दर्शन
पळसगाव (पि) गावामध्ये पूर परिस्थिती
गोंडमोहाळी ग्रामवासीयांनी घडविले माणुसकीचे दर्शन
पुरात अडकलेल्या लोकांची केली भोजनाची व निवासाची सोय
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले आदिवासी बहुलगाव गोंडामोहाळी ग्रामस्तानी पुरात अडकलेल्या ६० लोकांना गावातील लोकवर्गणी जमा करून त्यांचा भोजनाची व निवासाची सोय केली करून त्यांची आस्थेने काळजी घेतली खरच गोंडामोहळी वासीयानी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दिनांक. ४ सप्टेंबर ला मुसळधार पावसामुळे पळसगाव येथील भडक नाल्यावर पुलाचे वरती १० फूट पाणी असल्यामुळे मजुरी साठी मजूर वर्ग खाजिगी गाडीने बाहेर गावी गेले होते.व काही ग्रामस्थ शासकीय कामा करिता गेले होते.
पळसगाव येथील भडक नाल्यावर्ती पाणी साचल्यामुळे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे त्यांना गोंडमोहाळी या ठिकाणी मुकमी राहावे लागले त्यांची राहण्याची व जेवणाची सोय गोंड मोहाळी वासीयांनी केली,सदानंद मसराम,अनील कुंभरे सर,उत्तम अलोने,अमोल तोडसे व गावातील तरुण मुले व गावकरी यांनी पुढाकार घेतलामूळे पूर ग्रस्तांनी आधार मिळाला आहे त्या बद्दल गावसीयांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!