वाढदिवसाला कुठल्याही पद्धतीचा खर्च न करता पूर ग्रस्तांना दिल्या जिवणावश्यक वस्तूची भेट
वाढदिवसाला कुठल्याही पद्धतीचा खर्च न करता पूर ग्रस्तांना दिल्या जिवणावश्यक वस्तूची भेट
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - वाढदिवस म्हटलं की खर्च आलाच मग अशावेळेस वाढदिवस साजरा करण्याकरिता मित्रांसोबत बाहेर फिरणे , मोठं - मोठे समारंभ आयोजित करणे , पार्टी अरेंज करणे असा हा वाढदिवस साजरा केल्या जातो परंतु चिमूर पंचायत समितीचे सेवाभावी तंत्रस्नेही शिक्षक ओमेश बबनराव जांभूळे यांच्या वाढदिवसाला कुठलाही वेस्ट खर्च न करता चिमूर जवळील चिखलापार पूरग्रस्ताना जिवणावश्यक वस्तू भेट देऊन स्वतःचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी गावकरी बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा केला व पुढील कार्यास शुभेच्छा सुद्धा दिल्या यावेळी चिखलापार येथील सरपंच संतोष डांगे , गटशिक्षण अधिकारी पिसे सर , भोयर सर , लोखंडे सर , केळझरकर सर , नागदेवते सर , गेडाम सर , प्रविण सातपुते , रवी रासेकर , उधालक गेडाम , किसन कापसे , चंद्रकांत कापसे , भिमराव डांगे , अविनाश सोनवाने ,मनोज जांभुळे , उमेश फुटाणे व आदिनची उपस्थिती होती.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!