चंद्रपूर जिल्ह्यातील ६ सुरक्षा रक्षकांना विना कारण कामावरून कमी केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

चंद्रपूर जिल्ह्यातील ६ सुरक्षा रक्षकांना विना कारण कामावरून कमी केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - दिनांक. ०३/०९/२०१९  चंद्रपूर जिल्ह्यातील ६ सुरक्षा रक्षकांना विना कारण कामावरून कमी केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांना गौतम पाटिल युवक काँग्रेस विधानसभा कार्याध्यक्ष यांनी निवेदन दिले. सुरक्षा रक्षक हे अनेक वर्षांपासून उप जिल्हा रुग्णालय चिमूर तसेच वरोरा व ग्रामीण रुग्णालय बल्लारशा या ठिकाणी कार्यरत असून कुठलेही कारण स्पस्ट न करता सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले.व मागील महिन्यांपासून त्यांची वेतन देण्यात आली नसून सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची पाळी आली असून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी खेमणार यांना सुरक्षा रक्षकांनी आप बिती स्पस्ट करून संगीता दिनकर देशपांडे , रत्नमाला पूर्णचंद्र कामतवार , मनोज ठोंबरे तसेच इतरांना कामावरून कमी केले असून आम्हा सर्वांना वरोरा शहरातील नगर सेवक जैरुद्दीन छोटुभाई शेख यांनी तसेच त्यांची खाजगी कामकाज पाहणारी मुलगी दिप्ती चुनारकर यांनी मिळून ५० हजार रुपयांची मगणी केली असून नाहीलाजने आम्हा महिलांना काँग्रेस पक्षाचे पाठबळ घ्यावे लागले असून या पैसे मागणाऱ्या लोकांवर योग्य त्या प्रकारची कारवाई करावी व सुरक्षा रक्षक म्हणून कामावर घेण्यात यावे अशी यावेळी जिल्हाधीकरी यांना माहिती दिली असून या घटनेला बोल फुटले आहे व याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यांत रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!