मॅजिक बस संस्थेच्या वतीने उश्राळा व भादुर्णी गावात पोषण आहार सप्ताह संप्पन
मॅजिक बस संस्थेच्या वतीने उश्राळा व भादुर्णी गावात पोषण आहार सप्ताह संप्पन
मारोडा (आकाश गेडाम) :
दिनांक - 1 ते 7 सप्टेंबर हा सप्ताह सर्वत्र पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्याने मूल तालुक्यातील भादुर्णी व उश्राळा या गावान मध्ये मॅजिक बस संस्थेच्या वतीने पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने सकाळी प्रभातफेरी काढून, "फळ खाऊया ताजे ताजे शरीर होईल निरोगी माझे" अशा प्रकारे नारे आणि जयघोषयाच्या जोल्लोशात लोकांना संतुलित आहार घेण्याचा संदेश प्रभातफेरीच्या माध्यमातून देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी संतुलित आहार घ्यावा या साठी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.
मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनातं व नियंत्रणात संपूर्ण सप्ताहातील कार्यक्रमाचे नियोजन झाले. आत्राम सर मुख्याध्यापक जि. प. शाळा भादुर्णी व सर्व शिक्षकवृंद, देशकर सर मुख्याध्यापक जि. प. शाळा उश्राळा व सर्व शिक्षकवृंद, भूषण खडसे सर मुख्यमंत्री ग्रामविकास प्रवर्तक, आकाश गेडाम शाळा सहाय्यक अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर व CYL आशिष मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

ReplyForward
|



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!