पळसगाव गावाला वेधले पुराणे;अनेकांच्या घराची पडझड

पळसगाव गावाला वेधले पुराणे;अनेकांच्या घराची पडझड


जिल्हा परिषद शाळा व ग्राम पंचायत येथे केले नागरिकांना स्थलांतरित.

गावाला येणारे सर्व मार्ग गेले पाण्याखाली,अनेक नागरिक गावा बाहेर



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चिमर तालुक्यातील ताडोबा बफर झोन मधे येत असलेल्या शिंदेवही मार्गावर असलेले पळसगाव गाव हे तालुक्यात पडत असलेल्या एकाच दिवसाच्या पाण्याने जलमय झाले आहे.पळसगाव गावाच्या शेजारी असलेली मुसळधार पावसाने बोळी या वर्षीच्या पाण्याने फुल भरून असल्याने दोन दिवसाच्या जोराच्या पावसाने बोळीची पार फुटून पाणी गावात शिरले जिकडे तिकडे पाणी पाणीच होते या पाण्याने गावातील महादेव गावतुरे,मारोती शेंडे,नामदेव झोडे,हरीचंद्र गूळधे सह ३० लोकांची भिंत व छते पडलेली आहेत.मुसळधार पाऊस मुळे अनेकांचे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यांना सध्या  जिल्हा परिषद शाळा पळसगाव व ग्राम पंचायत ७ कुटुंबाना स्थलांतरित ग्राम पंचायत व शाळे मधे राहण्याचा सहारा गावातील ग्राम पंचायत कर्मचारी पोलीस पाटील,पत्रकार गावातील तरुण व गाव वासीयांनी करून दिला आहे. पळसगावला येणारे सर्व मार्ग पूर्णतः बंद झाले आहेत,सध्या तरी त्यांना प्रशासनातर्फे कोणतीही प्राथमिक सुविधा मिळत नाही.घरांची पडझड होऊन लोकांचे अन्न सुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे.यातच गावातील सहकाऱ्या कडून मदत घेऊन निवारा गावातील लोक करीत आहेत. आशा स्थितीत असताना प्रशासनाचे एकही अधिकारी अजून पर्यंत उपस्थित नाही. तसेच लोकप्रतिनी मात्र गावातील पूरग्रस्त कुटुंबाच्या संपर्कात आहे, गावातील लोक मदतीच्या हाक प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना देत असून जो पर्यंत आम्हाला आम्हचा हक्कच घर बांधून मिळत नाही तो पर्यंत आमच्या निवासीची सोय प्रशासनाने करावी अशी मागणी पूरग्रस्त सरपंच.गीता शेंडे,नामदेव गावतुरे,महानंदा गुळधे,अनिल सोनूले,गोकुळ सोनूले,यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ वेक्त केली आहे.अशा परिस्थिती मध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!