पळसगावं वासीयांनी केला निर्धार जो पर्यंत आम्हला पक्के घर देणार नाही तो पर्यंत आम्ही प्रशासणाची तोकडी मदत घेणार नाही ग्राम पंचायत मध्ये व स्थलांतरित पुरग्रस्तांची नागरिक मागणी
पळसगावं वासीयांनी केला निर्धार जो पर्यंत आम्हला पक्के घर देणार नाही तो पर्यंत आम्ही प्रशासणाची तोकडी मदत घेणार नाही
ग्राम पंचायत मध्ये व स्थलांतरित पुरग्रस्तांची नागरिक मागणी
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन मधे येत असलेल्या पळसगांंव मध्ये दिनांक 4 सप्टेंबर ला संततधार पाण्याने जलमय झाले होते. गावाच्या शेजारी असलेली मुसळधार पावसाने बोळी या वर्षीच्या पाण्याने फुल भरून असल्याने दोन दिवसाच्या जोराच्या पावसाने बोळीची पार फुटून पाणी गावात शिरले जिकडे तिकडे पाणी पाणीच होते या पाण्याने गावातील महादेव गावतुरे,मारोती शेंडे,नामदेव झोडे,हरीचंद्र गूळधे,नारायण सगळामे,विलास मोहूरले, सह ३० लोकांची भिंत व छते पडलेली आहेत.मुसळधार पाऊस मुळे अनेकांचे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यांना सध्या जिल्हा परिषद शाळा पळसगाव व ग्राम पंचायत कुटुंबाना स्थलांतरित ग्राम पंचायत व शाळे मधे राहण्याचा सहारा गावातील ग्राम पंचायत कर्मचारी पोलीस पाटील,पत्रकार , वासीयांनी करून दिला आहे. पळसगावला येणारे सर्व मार्ग पूर्णतः बंद झाले होते,.अनेक घरांची पडझड होऊन लोकांचे अन्न सुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे.यातच विधानसभेतील पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने सहकाऱ्या कडून मदत घेऊन निवारा गावातील लोक करीत आहेत. , गावातील लोक मदतीच्या हाक प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना देत असून जो पर्यंत आम्हाला आम्हच्या हक्काचे घर बांधून मिळत नाही तो पर्यंत आम्ही शासनाची तोकडी मदत सद्या तरी घेणार नाही अशी भूमिका पूरग्रस्त लोकांच्या भावनेतून वेक्त करीत आहे,आमच्या पक्क्या घराची सोय प्रशासनाने करावी अशी मागणी पूरग्रस्त सरपंच.गीता शेंडे,नामदेव गावतुरे,महानंदा गुळधे,अनिल सोनूले,गोकुळ सोनूले,महादेव गावतुरे,आनंदराव गावतुरे,कृष्णा चौधरी,हरीचंद गुलढे,यां पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे, अशा परिस्थिती मध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
_____________________________________
चिमुरचे तहसीलदार यांनी जेवनाची व्यवस्था तसेच राहण्याची सोय उपलब्द करून दीले . राशन दुकान वाल्याना अनाज उपलब्द करून देण्याचे आदेश दीले . तसेच ज्यांचे पुर्णता घर पडले आहे त्यांना लवकरच नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगीतले .तसेच लवकरात लवकर ड यादीतील पात्र लाभार्थ्याना घरकुल देणार , तसेच एका गरोदर मातेला इलाजासाठी पाहीजे तशा सेवा उपलब्द करू असे त्यांनी सांगीतले .
....संजय नागतीलक , तहसील दार चिमुर
____________________________________
जि. प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांना माहीती मिळताच त्यांनी पळसगांव येथे जाऊन संपुर्ण घरांची पाहणी केली व शासन स्थरावर सूचना केल्या की यांना शासन निर्णयानुसार ९५ हजार रुपये प्रति घर त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी एवढेच नाही तर त्यांनी घरे पडलेल्या कुटुंबाची ५ ते ६ दिवसांची जेवणाची व इतर साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत केली .
–––––––––––––
-----------------------------------
आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी पळसगाव येथील रात्रोला पडझडग्रस्त कुटूंबियाची भेट घेतली आणि सांत्वन करीत शासकीय मदत मिळवून देणार असल्याचा शब्द दिला. आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी आपल्या खर्च मधून पडझड घर झालेल्या कुटूंबियांना जीवनाश्यक वस्तू चा पुरवठा केला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!