शिक्षक दिनी कर्मचाऱ्यांनी केला शासनाचा निषेध

शिक्षक दिनी कर्मचाऱ्यांनी केला शासनाचा निषेध
 _DCPS /NPS योजने विरुद्ध कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध


पोंभूर्णा (सुरेश कन्नमवार)
महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, कर्मचारी शिक्षक- शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे, सर्व  संवर्गातील वेतन त्रुटी दूर करणे आणि आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून शासनाविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
संपूर्ण तालुक्यातील  महाविद्यालये,  तहसील कार्यालय, जलसंपदा विभाग, वनविभाग, पंचायत विभाग, जिल्हा परिषद शाळांमध्ये हा निषेध नोंदविण्यात आला. याअगोदर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले आहेत. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना नाकारून शासनाने परिभाषित अंशदायी पेन्शन योजना हे अन्यायकारी योजना लावली आहे. . या नवीन योजनेत कुटुंब निवृत्ती वेतन आणि आणि ग्रॅज्युटी यासारख्या सुविधा नाहीत*. परिणामी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास तीन हजार कर्मचारी मृत झाले असून पेन्शन अभावी त्यांचे कुटुंबीय हलाखीचे जीवन जगत आहेत.   
        याशिवाय अनेक न्याय्य मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकतेची वज्रमूठ केले आहे. आज संपूर्ण दिवसभर सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या आडमुठे धोरणाचा निषेध व्यक्त केला आहे. सदर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 9 सप्टेंबरला एक दिवसीय लाक्षणिक संप व मागण्या मान्य न झाल्यास 11 सप्टेंबर पासून बेमुदत संप करण्यात येणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले. आजच्या निषेध आंदोलनात राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!