राजुरा विधानसभेत गोदरु पाटील जुमनाके किंवा भारतभाऊ आत्राम स्वतंत्र उभे राहण्याची शक्यता

राजुरा विधानसभेत गोदरु पाटील जुमनाके किंवा भारतभाऊ आत्राम स्वतंत्र उभे राहण्याची शक्यता


राजुरा ( महीपाल मडावी)
राजुरा विधान सभा क्षेत्रात आदिवासींचे मते निर्णायक असतांना एकही आदिवासी आमदार झाला नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल एकही बड्या पक्षाने आदिवासी नेत्याला उमेदवारी दिली नाही. मात्र राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेस मध्ये  उमेदवार नसल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. याचे कारण राजुरा लैंगिक अत्याचार प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. 

 या प्रकरणामुळे संपुर्ण आदिवासी माजी आमदार यांचे विरोधात असल्याची खुली चर्चा आहे. माजी आमदार यांना काँग्रेसची तिकीट दिल्यास सर्व काँग्रेसच्या उमेदवारांवर बहीष्कार टाकण्यात येईल अशीही चर्चा आहे यामुळे जिल्ह्यात सर्व क्षेत्रातील  निवडणुकीकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्रातही काँग्रेसच्या उमेदवाराला आदिवासी जनतेकडुन धक्का बसनार आहे अशीही चर्चा आहे. 

जिल्हा परीषदेच्या तीन क्षेत्रातुन निवडुन जानारे काँग्रेसचे गोदरु पाटील जुमनाके यांना उमेदवारी मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पक्षाने त्यांचा का विचार केला नाही ही शंकेची बाब आहे. तसेच भारत आत्राम हे सुद्धा निवडणुकीत उमेदवारी आजमावनार असल्याची चर्चा आहे. भारत आत्राम हे मागील आमदारकीच्या निवडणुकीत उभे होते त्यांना निवडणुकीचा अनुभव  आहे. आणि त्यांना माननारा वर्ग  सुध्दा आहे यामुळे काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराला धोका असुन मागील निवडणुकीत त्यांच्यामुळेच काँग्रेसचे सुभाष धोटे यांना हार पत्कारावी लागली होती अशी चर्चा आहे. 

राजुरा विधानसभेत आदिवासी उमेदवार उभा झाल्यास निश्चित धुरंदर नेत्यांना धोका होनार आहे एवढे निश्चित.

३ टिप्पण्या:

झिंदाबाद!