एरोनॉटिक फिटर घडणार आता नागपूरात.
एरोनॉटिक फिटर घडणार आता नागपूरात. फ़ान्स ची "दसाल्ट" कंपनी घडविणारं नागपूरात ऐरोनाॅटीक फिटर.
पहिल्या सत्रात होणार 20 एरोनॉटिक पिटर तयार.
नागपूर (प्रतिनिधी)
विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय)मिळणार असून,या संदर्भातील पत्र नागपूर आयटीआय ला प्राप्त झाले आहे. 'एरोनाटीकल स्ट्रक्चर अँड इक्युपमेंट फिटर' असे या महत्वपूर्ण अभ्यासक्रमाचे नाव असल्याची माहिती सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण.यांनी म.रा.मराठी पत्रकार संघाचे विदर्भ पदाधिकारी यांच्या सदिच्छा भेटीत दिली.सदर महत्त्वपूर्ण अभ्यासक़म राज्याचे
कौशल्य विकास विभागाचे तत्परतेने महाराष्ट्रात आला अन्यथा हरियाणा राज्यात सदर
महत्त्वपुर्ण प़कल्प पळविण्याचे
प़यत्न सुरू होते हे विशेष.
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योगता मंत्रालय व फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हीएशन कंपनीशी या संदर्भात सामंजस्य करार झाला आहे.तीन वर्षासाठी या अभ्यासक्रमाची जबाबदारी 'दसॉल्ट ऐव्हिऐशन,फ़ान्स"या आंतरराष्ट्रीय कंपनिने घेतली आहे.विमान कंपन्यांच्या आंतराष्ट्रीय माणका प्रमाणे कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे.मात्र असे प्रशिक्षण केंद्र भारतात सद्यातरी कुठेच उपलब्ध नाही.त्यामुळे दसॉल्ट कंपनीने प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्रम विकसित करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या डिझाइन पासून ते उत्पादन आणि देखभाल करण्याचे प्रशिक्षण देण्याचे नियोजित केले आहे.या अंतर्गत नागपूर आयटीआय ला संपूर्ण यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्याच बरोबर तीन वर्षे दसॉल्ट कंपनी तज्ञांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असून,विमान दुरुस्ती चे धडेही दिले जाणार आहेत.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरवात
10 वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी असून,आयटीआय 2019-2020 या या सत्रासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते,त्यांना एसएमएस पाठविण्यात येणार आहे.21 सप्टेंबर पासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.प्रवेशासाठी आयटीआय च्या संकेत स्थळावर नोंदणी करायची आहे.अधिक माहिती आयटीआयच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून,25 सप्टेंबर च्या सायंकाळी गुणवत्ता यादी आयटीआयच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.व 26 सप्टेंबर रोजी अंतिम मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केल्या जाणार असल्याची माहितीही संचालक..........यांनी दिली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!