अहेरी शहरात नवीन 33 kv सब स्टेशन मंजूर.
अहेरी शहरात नवीन 33 kv सब स्टेशन मंजूर.
अहेरी (सेवा पवार)
अहेरी शहर व परिसरातील 40 गावातील वीज समस्या सुटणार असून
राजे अम्ब्रिशराव महाराजांनी दिलेला शब्द केला पूर्ण,4 कोटी 80 लक्ष रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे.
अहेरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून 33 kv सब स्टेशन व्हावे अशी येतील जनतेची मागणी होती, अहेरीचे आमदार मा.श्री.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने ह्या मागणीचा पाठपुरावा केल्याने ती मागणी आत्ता पूर्ण झाली आहे.
अहेरी शहरात नवीन 33 kv सब स्टेशनला ऊर्जा मंत्रालयाने मंजुरी दिल्याचे पत्र देऊन नुकतेच कडविले आहे,गेल्या विधानसभा निवडणुकीत राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी आपण निवडुन आल्यास अहेरी येते नवीन 33 kv सब स्टेशन मंजूर करवून आणू असा शब्द अहेरीकरांनां दिला होता, जनतेला दिलेला शब्द राजेंनी अखेर पूर्ण केला आहे.
अहेरी शहरातील हा सुद्धा प्रलंबीत काम राजेंनी अखेर मार्गी लावला आहे.ह्या सब स्टेशनमुळे वारंवार वीज जाणे,व्होल्टेज कमी राहणे किंवा नेहमी कमी जास्त होणे,विजेचा नियमित पुरवठा न होणे अशा प्रकारच्या विजेच्या अनेक समस्या सुटणार आहेत,ह्याचा फायदा अहेरी शहर व परिसरातील 40 गावांना होणार असल्याने येतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!