वरोरा पोलीस स्टेशनचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकविले
वरोरा पोलीस स्टेशनचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकविले
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - नुकत्याच पार पडलेल्या वर्धा येथील शिव वैभव हॉल मध्ये आयोजित आर्यन मार्शल आर्ट्स अकादमी तर्फे मास्टर रमेश भगत व त्यांच्या टीमने राष्ट्रीय स्तरावरील ओपन चॅलेंज ब्लॅक बेल्ट चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा २२ ता. घेण्यात आली.
त्या मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाकडून पो. शि. प्रवीण चंदूजी रामटेके यांनी ब्लॅक बेल्ट(स्पारिंग फाईट) कराटे मध्ये सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्र पोलीस दलासोबतच नव्याने रुजू झालेल्या वरोरा पोलीस स्टेशनचे सुद्धा नाव लौकिक केले तर याच स्पर्धेत ३० ते ३५ वजन गाठातील कु प्रणय प्रवीण रामटेके वय १२ नि(स्पारिंग फाईट)मध्ये सुवर्णपदक पटकावले वरोर्याचे पो. शि. प्रवीण रामटेके यांनी स्वतःच्या मुलाला प्रशिक्षित केले असल्याने सुवर्णपदक जिंकलेल्या मुलाने त्याचे वडील प्रशिक्षक प्रवीण रामटेके च्या श्रमाने व मार्गदर्शनाने सुवर्णपदका पर्यंत मजल मारू शकलो असे सांगितले. तर पो. शि. प्रवीण राटेकेनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी व मार्शल आर्ट संस्थेचे अध्यक्ष मास्टर शंकर चालूरकर यांना दिलेल्या श्रेया सोबतच आपले पोलिस निरीक्षक उमेश पाटील चे आभार व्यक्त केले या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेला छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, हैदराबाद, दिल्ली, मध्यप्रदेश, सोबतच वेगवेगळ्या राज्यातून साडेआठशे स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कराटे अध्यक्ष जाकीर खान कराटे पीएचडी तसेच तेलंगणा राज्याचे कराटे अध्यक्ष श्रीनिबाबू उपस्थित होते. स्पर्धे अंती प्रमुख पाहुण्यांनी विजेत्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले यावेळी पोलीस शिपाई प्रवीण रामटेके नि रिकाम्या वेळात वरोरा येथील इच्छुक मुला मुलींना आत्मनिर्भर होण्यासाठी विनामूल्य प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली त्यांच्या या उपलब्धी मुळे अनेक स्तरावरून कौतुक केल्या जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!