तालुका अधिवक्ता संघ, अहेरीच्या वतीने पूरग्रसतांना भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण.
अहेरी (सेवा पवार)
तालुका अधिवक्ता संघ, अहेरीच्या वतीने पूरग्रसतांना भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण
क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य एड. लालसू नोगोटी यांच्या प्रमुख उपस्थित जीवनावश्यक वस्तुंचे वाटपकरण्यात आले.
दिनांक 13 सेप्टेम्बर रोजी तालुका अधिवक्ता संघ अहेरीच्या वतीने भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे भामरागड तालुक्यातील गुंडूरवाही येथील पूरग्रसतांना वितरीत केले. अहेरी तालुका अधिवक्ता संघाचे सदस्य एड. राजेंद्रप्रसाद मेंगनवार, एड. सतीश जैनवार, एड. संघरत्न कुंभारे यांनी क्षेत्राचे जिल्ह्य परिषद सदस्य एड. लालसू नोगोटी यांच्या उपस्थितीत भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले. भामरागड ते गुंडूरवाही रास्ता पावसामुळे खराब झालेला आहे.
अहेरी तालुका अधिवक्ता संघाचे सदस्य ट्रैक्टरने प्रवास करत मौजा गुंडूरवाही येथे जाऊन त्यानी गावातील पूरग्रस्त व गरजूना भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले. या प्रसंगी या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य तथा अहेरी तालुका अधिवक्ता संघाचे सदस्य एड. लालसू नोगोटी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जीवनावश्यक वस्तुंचे वितरण झालयवर अधिवक्तानी गावकऱ्यांशी गावातील अन्य समस्यावर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी अहेरी तालुका अधिवक्ता संघाचे सचिव एड. राजेंद्रप्रसाद मेंगंनवार म्हणाले की, आदिवासींचे जीवन हे संघर्षमय आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक समस्याना तोड़ देत आपले जीवन जगत आला आहे. अनेक लोक तुमच्या पाठीशी आहेत. म्हणुन खचून जाऊ नये. गावकरयांच्या वतीने एड. लालसू नोगोटी यांनी अधिवक्ता संघाचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!