मॅजिक बस संस्थेच्या वतीने शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

मॅजिक बस संस्थेच्या वतीने  शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न


मूल (अमित राऊत)
मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नितंत्रणात दिनांक 21 ते 24 आणि दिनांक 26 ते 29 ऑगस्ट 2019 ला मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुल तालुक्यातील एकूण 51 शाळेतील 107 शिक्षकांन साठी चार दिवसाचे प्रशिक्षण दोन टप्प्या मध्ये कर्मवीर महाविद्यालय मूल व गुरुसाई इंटरनेशनल स्कुल मुल या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. 

मॅजिक बस संस्थे द्वारे खेळातून शिक्षण/जीवन कौशल विकास हा कार्यक्रम 12 ते 18 वर्ष वयोगातील विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो. आणि या द्वारे विद्यार्थ्यांना सांघिककार्य, संवाद कौशल्य, समस्यांची सोडवणूक, अनुभवात्मक शिक्षण, स्वव्यवस्थापन इत्यादी जीवन कौशल्य त्या सोबतच लिंग समानता आणि शिक्षणाचे महत्त्व खेळाच्या माध्यमातून शिकविले जातात. 
हा कार्यक्रम आता शाळेने राबवावा या हेतूने शिक्षकांच्या  प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये खाजगी आणि जिल्हा परिषद शाळेच्या एकुण 107 शिक्षकांचा सक्रिय सहभाग होता.
मॅजिक बस संस्थेचे अर्जुन काटे हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले, सोबतच मंगेश कांबळे, सायलीताई, संदीप राऊत इत्यादी मान्यवर प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. 
प्रशिक्षनाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बसचे शाळा सहाय्यक अधिकारी संदेश रामटेके, निखिलेश चौधरी, आकाश गेडाम, शुभांगी रागोनवार यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!