स्थानीकांना प्राध्यान्य दया अन्यथा आंदोलन करणार
कोयला माती खदान माजरी कॉलरी(रंजित बिल्डकॉम कंस्ट्रक्शन युजी टु ओसी माईन माजरी क्षेत्र)गावातील स्थानीकांना प्राध्यान्य दया अन्यथा आंदोलन करणार
- मनसे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा क्षेत्र)किशोर मडगूलवार यांचा इशारा
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - उद्योगांमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी मनसे सतत आग्रही असून,माजरी येथील कोयला खदाणीत काम करत असलेल्या काम करणाऱ्या परप्रांतीय विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून सात दिवसाच्या आत स्थानिक लोकांना रोजगार देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. कोणत्याही कामात स्थानिकांना प्राधान्य देण्याची तरतूद राज्यशासनाने केली असताना सुद्धा त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही, तसेच कंपनीचा होणार त्रास हा फक्त स्थानिकांनाच होत असतो, परंतु स्थानिकांना डावलून इतर राज्यातील लोकांना प्राधान्य देण्याची मानसिकता सर्व उद्योगांची असल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सात दिवसात या विषयावर तोडगा काढण्याची तंबी माजरी कोयला खदानीच्या प्रशासनाला दिली आहे तसेच सोबतच एरिया मॅनेजर यांनाही यावेळी मागणी केली असून, स्थानिकांना घेऊन आंदोलन करून कंपनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा निर्धार मनसेने केला आहे.
सदर शिष्टमंडळात यावेळी मनसे चे जिल्हासचिव बल्लारपूर विधानसभाक्षेत्र किशोर मडगूलवार,प्रविन शेवते,क्रिष्णा गुप्ता,मुन्ना किरंगे,सुक्रु धुवै,माजरी शहरअध्यक्ष चिंटु कोयलवार,उपाध्यक्षअभय निबांडवार,सचिव रमेश कोयलवार,राजेश पिसे,माधव वर्मा,बिलू भारती तसेच मनसेचे कार्यकते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थीत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!