मंजुर योजनेचे अनुदान लाभार्थ्यास मिळण्यास विलंब
चिमुर पंचायत समीतीमार्फत समाज कल्याण विभागातील मंजुर योजनेचे अनुदान लाभार्थ्यास मिळण्यास विलंब
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - २० टक्के सेसफंड समाजकल्याण विभाग जी.प.चंद्रपुर अंतर्गत सन २०१७/१८ अंतर्गत वैय लाभाची योजना चिमुर पंचायत समीती अंतर्गत लाभार्थ्याना टु इन वन शीलाई मशीन , काटेरी तार , ताडपत्री , व अन्य योजना मंजुर झालेल्या आहेत . पण या योजनेचे अनुदान मिळण्यास येथील अधीकाऱ्याच्या दीरगांईमुळे लाभार्थ्याना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे .
एकीकडे शासन टु इन वन शीलाई मशीन प्रशीक्षीत महीलांना आर्थीक बाजु कमजोर असलेल्या अनुसुचीत जातीतील महीलांना घरघुती रोजगार प्राप्त व्हावा यासाठी समाज कल्याण विभाग महीलांना पंचायत समीती मार्फत अर्ज मागवुन ते मंजुर करून शीलाई मशीन घेण्यासाठी अनुदान देत असतो तसेच अन्य योजनेचे संबधीत विभाग लाभार्थ्याच्या सरळ बँक खात्यात अनुदान जमा करत असतो .
पण चिमुर पंचायत समीतीतील समाज कल्याण विभागातील संबधीत अधीकाऱ्याकडे टु इन वन शीलाई मशीनचे व अन्य योजनेचे अनुदान संबधीत कागदपत्रे लाभार्थ्यानी अधीकाऱ्याकडे देवुन सुध्दा अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यामुळे लाभार्थ्याना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागत आहे . तसेच या अनुदानासाठी लाभार्थ्यांचे स्वताचे राष्ट्रीयक्रुत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे . जाईंट खाते अनुदानासाठी जमणार नाही असे चिमुर पंचायत समीती येथील समाज कल्याण विभागातील संबधीत अधीकाऱ्याने व संवर्ग विकास अधीकाऱ्यांंनी सांगीतले .
या बाबीकडे चिमुर पंचायत समीतीतील गट विकास अधीकाऱ्यानी लक्ष देवुन लाभार्थ्यांचे शीलाई मशीनचे अनुदान खात्यात जमा करावे अशी मागणी लाभार्थी करीत आहेत .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!