१६ ऑगस्ट २०१९ ला शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रमाचे भव्य आयोजन सुप्रसिद्ध गायिका अमृता देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती

१६ ऑगस्ट २०१९ ला शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रमाचे भव्य आयोजन 
सुप्रसिद्ध गायिका अमृता देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती 

             सौ.अमृता देवेंद्र फडणवीस

 चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १६ ऑगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांती भूमीचे अमूल्य योगदान असून क्रांती लढ्याचे स्मरण करण्यासाठी १६ ऑगस्ट ला शहीद स्मृती दिन सोहळा आयोजित केला जात असून यावर्षी च्या शहीद स्मृती दिन सोहळ्याच्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती तथा दिव्यज फाउंडेशन संस्थापिका अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे .
  भारतीय स्वातंत्र लढ्यातील वीर हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटूंबियाचा भावपूर्ण सन्मान करणे व  अखंड बलशाली भारताचे स्वप्न बाळगणारे भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रथम स्मृती दिन निमित्त अभिवादन करणे तसेच महिलांना सुरक्षा व बाध्य विचार घेऊन नारी शक्ती सन्मान महोसत्व अंतर्गत रक्षाबंधन कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे .
      अमर शहिदाना विनम्र श्रद्धांजली ,स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या कुटूंबियाचा सत्कार व रक्षाबंधन कार्यक्रम चे आयोजन केले आहे 
    १६ ऑगस्ट शहीद स्मृती दिन सोहळा दरम्यान पंचायत समिती मधील चिमूर प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण ,सामाजिक न्याय विभाग अंतर्गत मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह लोकार्पण, शहीद बालाजी रायपूरकर सभागृह लोकार्पण व महावितरण अंतर्गत जांभुळघाट ३३ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण आयोजित केलेले आहे
   शहीद दिन स्मृती दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती,दिव्यज फाउंडेशन संस्थापिका अक्सीस बँक पश्चिम भारत उपाध्यक्ष तसेच समाजसेविका अमृता देवेंद्र फडणवीस तर विशेष अतिथी खासदार अशोक नेते ,खासदार रामदास तडस आमदार रामदास आंबटकर, प्रमुख अतिथी भाजप जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा जीप अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष रेणुका दुधे वसंत वारजूकर उपस्थित राहणार आहे.
     शहीद दिन स्मृती दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया,भाजप भाजपमहिला चिमूर व नागभीड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!