चिमूर बस स्थानकाचे काम कासवगतीने
चिमूर बस स्थानकाचे काम कासवगतीने
प्रवासी पडले विचारात
केव्हा होणार डिजिटल बस्थानकाचे बांधकाम पूर्ण ?
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभुळघाट : - महाराष्ट्रात शासनाने सर्व बस स्थानक हायटेक करण्याचे धूम धडका सुरू केला असून, कुठे कुठे या जोराच्या धुमात अनेक ठिकाणी नित्कृष्ठ दर्जाचे काम ठेकेदार करीत आहेत.मागील २ वर्षा पासून चिमूर बस स्थानकाचे भूमिपूजन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते करण्यात आला. दोन वर्षे उलटून सुद्धा ठेकेदार काम अतिशय कासव गतीने करीत असून, त्याचा फटका प्रवाशांना व बस वाहक काना बसत आहे. कासव गतीने काम सूरु असल्याने बस स्थानक परिसरात मोठ मोठे खड्डे पडून प्रवाशांना जाण्या येण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहेत.या मंद गतीच्या कामाने शाळेचे विद्यार्थ्यांना सुद्धा खूप त्रास होत आहे . या कामामुळे अनेक समस्याना सामोर जावे लागत आहे. कासवगतीने कामवर प्रशासाने लक्ष देऊन ठेकेदारांवर कारवाही करावी अशी मागणी प्रवाशी व चिमुर च्या स्थानिक नागरिकां कडून करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!