गोपनीय महितीच्या आधारे चिमूर पोलिसांनी सापळा रचून पकडला अवैध दारू साठा

गोपनीय महितीच्या आधारे चिमूर पोलिसांनी सापळा रचून पकडला अवैध दारू साठा


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - दिनांक ०९/०८/२०१९ ला आझाद वार्ड चिमुर येथे अवैध दारू विक्रेती महिला वनिता नंदू मोहिणकर यांच्या राहत्या घरी दारूबंदी बाबत प्रोव्ही. रेड केली असता या रेड दरम्यान ६१८ नग प्रत्येकी १८० मिली देशी दारूच्या निपा किंमत ६१८००  रु. व १२० नग इंपिरियल ब्लु व्हिस्की १८० मिली  च्या निपा किंमत ३६००० रु. असा एकूण ९७८०० रु चा मुद्देमाल  मिळून आल्याने दारू विक्रेती वनिता नंदू मोहिणकर व नंदू मोतीराम मोहिणकर यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपी महिला हिला अटक करण्यात आली. सदरची  कारवाई पोलिस अधिक्षक श्री. माहेश्वर रेड्डी ,अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे , उप विभागीय पोलिस अधिकारी , मारोती  इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे , नापोशी किशोर बोढे , पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, कुणाल राठोड , मपोशी उज्वला परचके , विजय उपरे यांनी पार पाडली व या मोहिमेमुळे अवैध दारू विक्रेते यांचे तिन तेरा वाजले असून त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!