न्याय मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर

न्याय मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर
- विविध मागण्यांचे मूख्यमंत्री ला  निवेदन 
- क्रांती दिनाचे औचित्य


    
नेरी/चिमूर : शुभम बारसागडे 

शालेय पुर्व शिक्षण व सकस आहारांविषयी महत्वपुर्ण कर्तव्य करणाऱ्या अंगनवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध न्यायक मागण्या मागील अनेक वर्षापासुन प्रलंबीतच आहेत. या मागण्यांच्या पुर्ततेकरिता चंद्रपूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) यांच्या वतीने शुक्रवारला हुतात्मा स्मारक समोर रास्ता रोखो व जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कार्याध्यक्ष इमरान इखलाख  कुरेशी यांचे नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरूण शासण विरोधी घोषणा देऊण संताप व्यक्त केला.
       महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून तसेच त्यांच्या समस्या सोडवून न्याय देण्यात याव्या अशी रास्त मागणी घेऊन अंगणवाडी कर्मचारी सभा विविध आंदोलनाच्या माध्यमातुन लढा देत आहेत. त्याच अनुशंगाने चंद्रपूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे आंदोलनाचे आयोजन क्रांती दिनाचे औचीत्य साधुन करण्यात आले. चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली देऊन व त्यांच्या स्मृतीच्या साक्षीने शुक्रवार ला न्यायीक मागण्या संबधात सरकारच्या उदासीन वृत्तीचा निषेध करून शासण विरोधी घोषणा देऊन चिमूर वरोरा मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
        अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन द्यावे, प्रधानमंत्र्यानी ११ सप्टेंबर २०१८ रोजी घोषीत केलेली मानधन वाढ द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनाच्या अर्धे मानधन मिळावे, एक रक्कमी सेवा निवृत्ती वेतन त्वरीत द्यावे, अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलचे गहाळ अथवा तुट्फुट झाल्यास त्यांना भुर्दंड न करता शासणाने त्या मोबाईलचा विमा करावा, सेविका व मदतनिसांची रिक्त पदे त्वरीत भरावी, मिनि अंगणवाडीला मदतनिस देण्यात यावी, नगर पालिका क्षेत्रात प्रभागाची अट न ठेवता सेवा जेष्ठतेनुसार मदतनिसांना नियुक्त करण्यात यावी आदी प्रलंबीत मागन्या निवेदणात आहे. 
       मूख्यमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यांना तहसिलदार संजय नागटिळक यांचे मार्फत प्रतिनिधीक शिष्ठमंडळाद्वारे निवेदण देण्यात आले. शिष्ठमंडळात जिल्हा कार्याध्यक्ष इमरान कुरेशी,चिमूर तालुका अध्यक्ष माधुरी विर, वरोरा तालुका अध्यक्ष अन्नपूर्णा हिरादेवे, उपाध्यक्षा पुष्पा ठावरी, भद्रावती तालुका उपाध्यक्षा सांजणा बंडावार, सचिव निराशा चौधरी, सुलोचणा पडोळे, नंदा वरघने, इंदिरा आत्राम, नंदा आवारी, सुनिता भोपे, कमल वाकडे, सविता बोरकर, वैशाली ढोक, करुणा गुरनुले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या. सदर आंदोलनात चिमूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही, नागभिड तथा ब्रम्हपूरी येथील अंगणवाडी कर्मचारी शेकडोच्या संख्येने उपस्थित होत्या.
----------------------------------------
  मासिक अहवाल व ऑनलाईन माहितीला ब्रेक
        
अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गर्भवती माता व तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी आहार पुरविला जातो. शिवाय इतर योजनांचाही लाभ दिला जातो. मात्र सरकाचे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचारी आक्रमक बनले आहे. दरम्यान त्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान बाल विकास प्रकल्प कार्यालय व प्रशासनाला मासिक अहवाल सादर न करणे, आॅनलाइन माहिती न भरणे तसेच शासनाला कोणतीही माहिती न देणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत. 

       इमरान इखलाख कुरेशी
          जिल्हा कार्याध्यक्ष , अंगणवाडी कर्मचारी सभा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!