झाडीबोली साहित्य संमेलना तर्फे अमित राऊत यांचा सत्कार
मूल (पीयुष रामटेके)
झाडीबोली साहित्य मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, पतंजली योग समिती मूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिदिनानिमित्य मूल येथिल क्रीडा संकुल येथे पाऊसपाणी - काव्यवाचन व सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.
मूल तालुक्यातील तळागाळातील नागरीकांचे समस्या पत्रकारीतेच्या माध्यमातुन जनसामान्यापुढे आणुन त्यांना न्याय मिळवुन देण्याचे कार्य तसेच विविध समस्या शासनदरबारी पोहचविण्याचे काम सातत्याने करीत असल्याने याची दखल घेत पत्रकार अमित राऊत यांचा ग्रामगीताचार्य प्रा.बंडोपंत बोढेकर, मूल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांचे हस्ते मूलचे सर्च टीव्हीचे पत्रकार अमित राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,नगराध्यक्षा प्राचार्य रत्नमालाताई भोयर,झाडीबोली महिला अध्यक्षा शशिकला गांवतुरे,कवि सुखदेव चौथाले आदि उपस्थित होते. झाडीबोलीचा गजर
कार्यक्रमाचे संचालन बांडगे मॅडम यांनी तर आभार सुखदेव चौथाले यांनी मानले. शहरातील विविध स्तरातील नागरीकांनी अमित राऊत यांचे कौतुक केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!