महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या वतीने असहकार आंदोलनाला महाराष्ट्रात सुरवात अनेक निवेदन देऊन सुद्धा शासन झोपेत

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या वतीने असहकार आंदोलनाला महाराष्ट्रात सुरवात

अनेक निवेदन देऊन सुद्धा शासन झोपेत



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये असहकार आंदोलन आज ९ आगस्त २०१९ पासून सर्व राज्यात  सुरू झालेले आहे.शाखा चिमूर येथील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या अध्येक्षा कु.मंजुषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज चिमूर पंचायत समिती च्या प्रांगणात या असहकार आंदोलनाला क्रांती दिवसाचे अवचित्यव साधून सुरवात झाली.यामध्ये ग्रामसेवकांच्या प्रमुख मागण्या १)ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्माण होणे, २) ग्रामसेवक संवर्गास प्रवाज भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे. ३) ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल करून पदविधर ग्रामसेवक नेमनूका होणे बाबत.४) सन २०११ चे लोकसंख्येवर आधारीत राज्यभर ग्रामविकास अधिकारी साजे व पद वाढ करणे.५)ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी वेतनत्रुटी दूर होण्याबाबत.६)सण २००५ नंतरचे ग्रामसेवक यांना जुनी पेन्शन लागू करणे. ७)आदर्श ग्रामसेवक राज्य /जिल्हास्तर/आगाऊ वेतनवाढ एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती ८) ग्रामसेवकडील अतिरिक्त कामे कमी करणे. या सर्व मागण्यासाठी ग्रामसेवक युनियन अनेक वेळा निवेदन देऊन थकले पण शासन झोपेतून उठेना..! म्हणून आज राज्यभरात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन कडून असहकार आंदोलन सुरू आहे.

      या सर्व मागण्या आता पूर्ण झाल्या नाही तर राज्यभरातील २२००० ग्रामसेवक २२ आगस्त पासून  संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करून सर्व महाराष्ट्रातील २७५३६ ग्रामपंचायतच्या चाब्या पंचायत समिती कडे गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी यांचेकडे जमा करतील. ग्रामसेवकांच्या सर्व मागण्या शासनाने पूर्ण कराव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा चिमूर कडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!