मूल येथे पाऊसपाणी काव्यवाचन व सत्कार कार्यक्रम सम्पन्न

मूल येथे पाऊसपाणी काव्यवाचन व सत्कार कार्यक्रम सम्पन्न


मूल (अमीत राऊत)
          झाडीबोली साहीत्य मंडळ ,अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व पतंजली  योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीदिना निमित्त मूल येथिल क्रिडा संकुल येथे  "पाऊस-पाणी " काव्यवाचन व सत्कार कार्यक्रम करण्यात आला. 
   पाऊस-पाणी काव्यवाचनात शहरातील  एकुण  18 कवींनी  स्वलिखीत  काव्यवाचन केले. यावेळी मंचावर ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,नगराध्यक्षा प्राचार्य रत्नमालाताई भोयर,झाडीबोली महिला अध्यक्षा शशिकला गांवतुरे,कवि सुखदेव चौथाले आदि उपस्थित होते. झाडीबोलीचा गजर  "पाऊस-पाणी " या विषयावर मुल  शहरात अनेक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद  घेतला.
   या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्ललेखनिय कार्य करणा—या मूलच्या नगराध्यक्षा प्राचार्य रत्नमालाताई भोयर,सर्च टिव्हीचे मूल तालुका प्रतिनीधी अमित राऊत, नगर परीषदेच्या बालकल्याण सभापती प्रभा चौथाले, योग शिक्षीका विजया गोवर्धन, विजय लाडेकर या मान्यवरांचा सत्कार  करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बांडगे मॅडम यांनी तर आभार सुखदेव चौथाले यांनी मानले. झाडीबोली गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे धो धो पाऊसात "पाऊस-पाणी "काव्यवाचन करण्यात आले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!