लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक उलटला
लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक उलटला
अहेरी आल्लापली (सेवा पवार)
छत्तीसगड राज्यातील रायपुर येथून सिरोंचा कडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक आल्लापल्ली सिरोंचा मार्गावरिल पुसूकपल्ली येथील बसस्टॉप जवळ ट्रक उलटल्याची घटना ९ ऑगस्ट च्या मध्यरात्री घडली सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
मात्र मध्यरात्री पासून मार्ग बंद होते याठिकाणी शंभर पेक्षा अधिक वाहन मार्ग मोकळा होईपर्यंत उभी होती. परंतु या घटनेची माहिती भाजपचे कार्यकर्ते संदिप कोरेत यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित मार्ग मोकळा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केले व मार्ग मोकळा होईपर्यंत तीथेच होते शिवाय सहकार्य देखील केले व १० ऑगस्टला सकाळच्या सुमारास मार्ग मोकळा झाला व वाहनचालकांनी सामाजिक कार्यकर्ते श्री संदिप कोरेत यांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!