जनता विद्यालय नेरीचे सुयश
जनता विद्यालय नेरीचे सुयश
चिमुर तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन २०१९ स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी
कु. मयुरी संजय पुस्तोडे हिचा प्रथम क्रमांक
मोटेगाव - प्रतिनिधी ( अजित सुकारे )
मोटेगाव : - पंचायत समिती चिमूर शिक्षण विभागांतर्गत आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन २०१९ या स्पर्धेचे आयोजन दि.०९ ऑगस्ट २०१९ रोजी न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथे घेण्यात आली.
या स्पर्धेचा विषय रासायनिक घटकांची आवर्त सारणी : मानव कल्याणपर प्रभाव हा असून सदर स्पर्धेमध्ये एका माध्यमिक शाळेत एका इयत्ता ८ वि ते १० वी च्या विद्यार्थ्यांना सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कु मयुरी संजय पुसतोडे या जनता विद्यालय नेरीच्या विद्यार्थीनीने पटकावला.
सदर स्पर्धेत विजेती विद्यार्थिनी, मार्गदर्शिका कु. वाघमारे, बांबोळे आणि इतर विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. येरणे सर, पर्यवेक्षिका कु. बमनोटे,सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!