जागतिक आदिवासी दिन उत्साहात केला साजरा

जागतिक आदिवासी  दिन उत्साहात केला साजरा

९ ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिन राणी हिराई उत्सव समिती वरोरा तर्फे जल्लोषात केला साजरा



वरोरा - प्रतिनिधी (आलेख रट्टे)


वरोरा :- जागतिक आदिवासी दिवस  मोठ्या उत्साहाने "राणी हिराई उत्सव समिती व आदिवासी सगा समाज वरोरा बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला. बावणे मंगल कार्यालयात वरोरा येथे आदिवासी समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .गजाननराव मेश्राम नगरसेवक,न.प.वरोरा हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक मा.रमेश मेश्राम युवा नेते  आदिवासी सगा समाज वरोरा/ भद्रावती तर  कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक-मा.उत्तमराव गेडाम जेष्ठ साहित्यिक तथा आदिवासी समाज चिंतक 
तसेच मा.सिद्देश्वरराव चांदेकर माजी गटशिक्षणाधिकारी हे सुध्दा उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रातीकारी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून व गोंडी गीत सादरीकरण करुन करण्यात आली.
उद्घाटक मा.रमेश मेश्राम यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्या भाषणात समाज बांधवांना एकत्र आल्या शिवाय आपले अधिकार आपण मिळवु शकणार नाही असा मौलिक संदेश दिला. तरी सगा आदिवासी समाज बांधवांनी जमाती-जमाती मधला भेद - भाव विसरून एकत्र येऊन अन्याय विरुद्ध लढा देण्याची गरज आहे.  असे आपल्या भाषणातून   समाजाला सांगितले व प्रमुख पाहुणे सौ मनीषा मेश्राम नगर सेविका वरोरा, माया पेंदोर, त्रिवेणी मेश्राम, जेष्ठ समाजसेवक नागोजी सिडाम यांनी याचे मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.उत्तमराव गेडाम ‌आदिवासी‌ साहित्यिक यांनी आदिवासी आणि मुळनिवासी व आदिवासी समाजाची आजची विदारक परिस्थिती जागतिक दिनाच्या निमित्ताने स्पषट केली.तसेच सिदेश्वरराव चांदेकर साहेब यांनी आदिवासी समाजातील मुले स्पर्धा परीक्षेत कशी पुढे जातील याबाबत सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले व जागतिक आदिवासी दिनाचे सविस्तर महत्त्व पटवुन दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गजाननराव मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास सर्वांना एक मंञ दिला.
शिका, संघटित व्हा.सघर्ष करा आपण त्या मञाप्रमाणे शिकलो.मोठ्या पदाच्या नोकर्या हि मळवल्या . सुखात जीवन ही‌ जगत आहोत पण संघटीत झालो नाही अन् संघटीत नसल्याने सघर्ष‌ करू शकत नाही.हि मोठी शोकांतिका आपल्या समाजाची आहे .म्हणुन संघटीत होऊन सगळ्यानी आपले हक्क व अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्या समाज बांधवांकडून झाले पाहिजे.हा विचार आदिवासी ‌जागतिक दिनी उपस्थित आदिवासी बांधवां समोर व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-दर्शना विनोद आञाम यांनी केले.
तर प्रास्ताविक - गणपत येटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन  दिपाली मेश्राम यांनी केले‌.
कार्यक्रमाचे यशस्वतेसाठी नागोराव सिडाम,सुखदेव मेश्राम , देवानद मडावी,मा.सुरेश मडावी, सुभाष मडावी,या.विनोद आञाम, राजू वुईके,किशोर गेडाम,दिगाबर कुळसगे,देवराव मडावी,बालाजी मडावी,कबिर कुमरे ,वारलु परचाके , माया पेदोर, जयश्री मेश्राम, रोशनी भडके (आत्राम), सुनिता येटे, नंदा ‌मडावी,भ्राती मडावी,पुष्पा येटे,मगला मडावी,लता मेश्राम,शोभाताई सिडाम,सगीता कुळसगे,रविना मडावी,निलीमा मेश्राम,विना परचाके,आशा चांदेकर,इत्यादी सर्वांना फार मोठे योगदान दिले.‌सर्वांचे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!