मातोश्री विद्यालयात ग्रामगीता परीक्षा विषयावर विद्यार्थ्यांना प्रबोधन

मातोश्री विद्यालयात ग्रामगीता परीक्षा विषयावर विद्यार्थ्यांना प्रबोधन 

विद्यार्थ्यांनी थोरमहात्म्यांच्या जीवनचरित्रापासून प्रेरणा घ्यावी - बोढेकर 


चंद्रपूर (प्रतिनिधी ) - अ. भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने जिल्हातील सर्व शाळेच्या तुलनेत सर्वाधिक परीक्षार्थी बसविल्याबद्दल प्राचार्य सुर्यकांत खनके यांचा सत्कार ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते  करण्यात आला. याप्रसंगी ग्रामगीता परीक्षा समितीचे शहरप्रमुख आण्ण्याजी ढवस, महिला प्रचारक सौ. वृंदाताई हुलके,  सौ. कल्पनाताई गीरडकर, माध्यमिक विभागाचे  मुख्याद्यापक संजय बिजवे, प्राथमिक विभागाचे मुख्याद्यापिका  सौ. संध्या वाढई, ज्येष्ठ गणित शिक्षक प्रविण रोकमवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.   


याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी थोर महात्म्यांच्या जीवन चरित्रापासून प्रेरणा घेऊन नविन कौशल्य विकसित केली पाहिजेत. जीवन शिक्षणाची योग्य सांगड घातली पाहिजेत. प्राचार्य सुर्यकांत खनके यांनी ग्रामगीता परीक्षेच्या उपक्रमाचे कौतुक करून ह्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षणाची योग्य रूजवणूक होण्यास मदत मिळत असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र धर्मपुरीवार यांनीकेले. प्रबोधन कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारीवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!