नवरगाव व् सिंदेवाहि पोलिसांची एकाच दिवशी लाखोंची अवैध दारू वरती धड़क मोहीम

नवरगाव व् सिंदेवाहि पोलिसांची एकाच दिवशी लाखोंची अवैध दारू वरती धड़क मोहीम    

  
नवरगाव (अमोल निनावे)
           मोठ्या प्रमाणात सुरु असणाऱ्या अवैध धन्देला आळा घालण्यासाठी सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार श्री निशिकांत रामटेके यांनी चांगलीच कंबर कसली आहे.1/8/2019 पासून सतत ज्याचे ज्याचे अवैध धंदे सुरु आहे अश्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे करणाऱ्या वरती  रोजच्या रोज केसेस करने सूरु झाले आहे.आज दिनाक 10/8/2019 रोज शनिवारला एकाच दिवशी मोठ्या तिन केसेस करण्यास नवरगाव पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्याना यश आले आहे.तसेच सिंदेवाहिला नविन पो उप निरीशक नेरकर  यांनी सुधा आज मोठी कार्रवाई केलि आहे. नवरगावचे घनश्याम खोब्रागड़े वय 45 यांची देशी दारू  एकूण 2 पेट्या माल अन्दाजी कीमत 20 हजार चा  जप्त करण्यात आला .तसेच प्रीती शंभरकर यांची मोहदारू व् सडवा अशा  15 हजार चा माल जप्त केले व् नैनपुर येथील स्वप्निल नागदेवते यांची 7 डबक्या कैन  एकूण कीमत 45 हजार. अनिल जयराम वैरागडे वय 35 वर्ष राहणार देवडोंगरी वासेरा यांचे 35 टिल्लू देशी दारू आणि एक मोपेड गाड़ी अशा एकूण 53हजार 500 रूपेचा मुदेमाल जप्त करण्यात आला. समोरिल तपास सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार यांच्या मार्गदर्शनात त्यांचे कर्मचारी पोहवा विनोद बावणे ब. न.  1188, पोहवा वसंता नागरिकर 929, नापोशी विजय वाकडे 1116,पोशी मंगेश श्रीरामेश्री मंगेश श्रीरामे हे करीत आहेत. अश्या प्रकारे एकाच दिवशी लाखो रूपायची मोठी कार्रवाई करण्यात आली आहे. आज पर्यन्तच्या नवरगावच्या लोकांच्या पाहणीनुशार असे एकहि ठानेदार बघितले नाही जे सतत दोन दिवसा आड़ एक नवरगाव परिसरला चकर मारले असतील व् भेट दिली असेल प्रथमताच नविन ठानेदार श्री निशिकांत रामटेके हे एक दिवसा आड़ रोजच्या रोज नवरगाव परिसरला भेट देऊन कार्रवाई करीत आहे त्यामुळे नवरगाव वाशिय लोकांमधे खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे.सोबतच चंद्रपुर जिल्ह्याला लाभलेले पोलिस अधीक्षक श्री महेश्वरजि रेड़ी साहेब यांचे सुधा आभार वक्त करीत आहेत ज्याणी आम्हा सिंदेवाहि तालुक्याला रामटेके साहेबांन सारखे ठानेदार दिले .जे लोक आजपर्यन्त अवैध धन्देला माहिती सांगण्यास मागे रहायचे ते सुधा आता समोर होऊन ठानेदार श्री रामटेके  यांच्या सोबत काम करताना दिसत आहे.आज प्रत्यक्षात नवरगाव ग्रामपंच्यातचे सदश्य श्री प्रदीप ठाकरे यांनी दारू पकळुन दिली, अशीच सगड्या ग्रामपंच्यातच्या सदश्यानि समोर होऊन मोहीम राबवली किंवा ग्रामसभेत अवैध् धंदे बंद झाले पाहिजे अशा ठराव घेतला तर नवरगाव मधे अवैध धन्देला आळा बसेल असे अनेक नागरिकांचे म्हणे आहे.मात्र काही लोकांनी आज पोलिस चौकिला येऊन पोलिसांच्या कामात अड़चन निर्माण करण्याचा पर्यन्त केला व् स्वताच दारू पिउन होते यामुळे समोरिल कार्रवाई कश्या प्रकारे करतील अशी समश्या भेड़सावत आहे .शाशनाने अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर्ति  कठोरात कठोर कार्रवाई करावी असे लोकांची मागणी आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!