भाई बहन का प्यार.... रक्षाबंधन
भाई बहन का प्यार.... रक्षाबंधन
प्यार के दो तार से संसार बांधा है...
कार्टून,मोदी राखी बाजारात...
स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन एकाच तारखेला....
पोस्टाद्वारे राखी पाठविण्याचं प्रमाण झाले कमी...।
शंकरपूर... जगदीश पेंदाम..
भैया मेरे राखी के बंधन को निभाना इसे समझो ना रेशंम का तार भैया
मेरे राखी का मतलब है प्यार भैया मेरी बहना राखी की लाज तेरा भैया निभाये गा
बहना भाई की कलाई पे प्यार बंधा है..
रंगबिरंगी राखी लेके आई बहना राखी बंधवा ले मेरे विर..
महिना चांदी सोने के हार मांगो
अपने भैय्या का थोडासा प्यार मांगू, सोना हजार मागू इस राखी मे प्यार छुपा के लाई बहना राखी बंधवा ले मेरे विर....
या गाण्यांचे संगीत ने आज परिसरात दुकानात,बाजारात राखीचे विक्री होत असुन राखी या सणावर आधारित भारत देशामध्ये चित्रपट पाहायला मिळतात...
रक्षाबंधन बहिण भावाच्या प्रेमाची साक्ष देणारा सण म्हणून रक्षाबंधनाची सगळीकडे ओळख आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन मोठ्या पासून तर लहान व्यक्तीकडून आपल्या देशात साजरा करण्यात येत असुन या रक्षाबंधन सणानिमित्त शंकरपुर व परिसरातील दुकानात, बाजार मध्ये समोर वेगवेगळ्या लहान-मोठे रंगीबिरंगी राख्या लटकवलेल्या पाहायला मिळत असून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
दिवसेंदिवस वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक तरुण वर्ग आपल्या कुटुंबाकरिता आधार देण्याकरिता हंगामी व्यवसाय करतांना दिसत आहे सध्या रक्षाबंधन सण असल्याने अनेक दुकानदार रस्त्याच्या बाजूला राख्या विकण्याचा व्यवसाय सुरू केलेले पाहायला मिळत आहे.
योगायोगाने आलेला भारताचा स्वातंत्र्यदिन पंधरा ऑगस्ट हा त्या दिवसाला आल्याने सगळीकडे स्वतंत्र दिन साजरा करण्यात येत असते त्या दिवसाला बहीण-भावाच्या नात्याची दर्शन घडवणारा रक्षाबंधन हा सुद्धा आला आहे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे.
आजही राखी बांधतांना पहिले घरातील देवांना पूजाअर्चा करून त्यांना राखी बांधून बहीण भावाला राखी बांधते, पूर्वीदूर असलेल्या भावांना बहिण पोस्टाद्वारे राखी पाठवण्याचे काम करण्यात येत असायचे आज मात्र हे चित्र दुर्मिळ झालेले आहे तरी आजही मोबाईलच्या युगामध्ये पोस्ट विभागामार्फत राखी पाठवण्याची नवीन सुविधा करण्यात आली आहे. रक्षाबंधना पासून तर
श्रीकृष्णजयंती पर्यंत बहिण भावाला राखी बांधत असते.
रक्षाबंधनासाठी राखी विक्रीकरता बाजारात रस्त्याच्या बाजूला दुकानात मोठ्या प्रमाणात राखी विक्री होत असून 30 ते 35 दुकाने राखीनी सजलेली असून राखी घेण्याकरिता युवती मुली, महिलांनी सुद्धा चांगलीच गर्दी केली आहे.
सध्या बाजारात, दुकानात वेगवेगळ्या नावाच्या राख्या विक्री करता उपलब्ध आहे स्टोन राखी 10 ते 15 रुपये 150रुपये पर्यंत विक्रीसाठी आहे. तसेच डजनाप्रमाणे सुद्धा राख्या विकल्या जात आहे लहान मुलांकरिरता विशेष राख्या दुकानात विक्रीस आल्या असून डोरेमोन,मोटू...पटलू, छोटा.. भीम ,स्पायडरमॅन, टेडीवेअर, यासारख्या कार्टून राखी आल्या असून लहान मुलांची मने जिंकून घेतात तसेच मोदी राखी सुद्धा आली आहे मुलांच्या हट्टापायी आई सुद्धा त्यांच्या पसंतीच्या घेत असल्यामुळे या व्यवसाया मधून युवक वर्गाकडून या राखीच्या व्यवसायातून आपल्या आई वडिलांना हातभार लावताना दिसून येते.......



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!