ग्रामसेवक रमेश एकुडे व इतर दोषींना गुन्हा नोंद करून निलबीत करा विलास डांगे चिमूर शिवसेना तालुका प्रमुख यांची मागणी

ग्रामसेवक रमेश एकुडे व इतर दोषींना गुन्हा नोंद करून  निलबीत करा

विलास डांगे चिमूर शिवसेना तालुका प्रमुख यांची मागणी



जांभुळघाट - प्रतिनीधी (केवलसिंग जुनी)


जांभूळघाट : - कोटगाव येथील तत्कालीन ग्रामसेवक यांनी कोटगाव येथे कार्यरथ असतांना शत्रूघन गडमडे ते रमेश शेंडे यांचे घरा पर्यँत सिमेंट रस्ता 13 वित्त आयोग पंचायत समिती स्थर अंतर्गत  बनविण्यात आला त्या कामाची एम बी रेकार्ड करून डेप्युटी इंजिनियर शेख जिल्हा परिषद उपविभाग चिमूर यांनी केली त्या कालावधीत तत्कालीन  गटविकास अधिकारी ए बी जाधव,लेखा अधिकारी विशाल वासलवार होते त्यानंतर लगेच तीन महिन्यात मनरेगा अंतर्गत रमेश सेंडे ते शत्रूग्न गरमडे यांचे घरापर्यँत सिमेंट रस्ता बांधकाम प्रशासकीय मान्यता  तत्कालीन गटविकास अधिकारी ए बी जाधव यांनी दिली याही वेळी लेखा अधिकारी विशाल वासलवार हेच होते दोन्ही काम करण्यात आल्याचे भासवून न केलेल्या कामाचे पूर्ण देयक ए बी जाधव व विशाल वासलवार यांनी काढून दिले यासाठी माजी सरपंच,उपसरपंच रोजगार सेवक कार्यरत सरपंच उपसरपंच रोजगार सेवक यासाठी दोन्ही कालावधीत सरपंच, उपसरपंच हेच रोजगार सेवक पदाची जबाबदारी 2018 पर्यँत  सांभाळत होते  पालक तांत्रिक व इजिनियरची जबाबदारी एकाच व्यक्तीने पूर्ण केली असावी सन 2016 पासून  लेखी तक्रारी,वाट्स ऍप उप मु का अ पंचायत जाधव उप मु का अ मनरेगा बरध्ये यांना वारंवार कळविले प्रत्यक्ष वारंवार भेटलो तरी  श्री जाधव यांनी कारवाही न करता फसवणूक,भ्रष्ट्राचार,अनियमितता,करणाऱ्याची पाठराखण करण्यासाठी तातकालीन विस्तार रत्नपारखी यांनी तत्कालीन प्रभारी गविय मुदखेडे याचे सहीने पाठवून सुद्धा दाबून ठेवला आहे 
सदर प्रकरण मा.आयुक्त नागपूर विभाग नागपूर,मा.जिल्हाधिकारी चंद्रपुर,मा.मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर,नरेगा आयुक्त नागपूर,व उपयुक्त नरेगा नागपूर महोदय आपणास लेखी तक्रार, मा.जिल्हाधिकारी महोदय सोडून सर्वाना प्रत्यक्ष भेटून संपूर्ण प्रकार लक्षात आणून दिलेला आहे तरी सुद्धा परत आपले वाट्स ऍप वर पाठवत आहे कृपया नोंद घ्यावी व 
दोषींवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचा
आदेश व्हावा,अनियमितता  प्रकरणी कारवाही,अपहार प्रकरणी सेवेतून कमी करण्याचा आदेश व्हावा तसेच तत्कालीन गविय ए बी जाधव यांचेवर डी ई सुरु आहे व त्यांचे निवृत्तीला केवळ 9 महिन्यापेक्षा कमी कालावधी आहे त्यांना निलंबित न करता बदलीच्या ठीकानी सोडण्यात आले त्यांचे कालावधीत केलेल्या अपहाराचे रिकव्हरी रक्कम 50,00000 वरून निघू शकेल तरी चिमुर तालुक्यातील संपूर्ण कामाची चौकशी होऊन रिकव्हरी होई पर्यँत कोणतेही लाभ देऊ नये  ज्याप्रमाणे गडपिपरी,पुयारदंड,मदनापूर, चिचाळा शास्त्री येथील प्रकरणात  विशाल वासलवार यास निलंबित मात्र बाकी सगळे पालक तांत्रिक व इतरांना पैसे घेऊन माफ केले असावे  केले तसे गविय जाधव यांना निलंबित न करता पुन्हा भ्रष्ट्राचार लपविण्यासाठी प्रभार देण्यात आला त्यांनतर पुन्हा तोच प्रकार ए बी बांधव यांनी विशाल वासलवरचे मदतीने केला कारण वस्तूस्थिती लपविण्यासाठी परत चिमूर येथे नियुक्ती देण्यात आली हे प्रशासनाचे दुर्दैव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!