जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मोफत गणवेश वितरण तथा जंतुनाशक गोळ्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मोफत गणवेश वितरण तथा जंतुनाशक गोळ्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील ताडोबा राष्ट्रिय उद्यानाला लागून असलेल्या पळसगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्रथनिक शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी दोन गणवेश,शूज,मोजे, कमरपट्टा, टाय बेल्ट याप्रमाणे १९० विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे व साहित्याचे वाटप पळसगाव गावचे सरपंच गीता मारोती शेंडे यांच्या उवस्थिती मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसगाव ता,चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक ६ ऑगस्ट ला शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले,गणवेश वाटप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाफिज शेख प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सरपंच सौ गीता शेंडे , शाळेचे मुख्याध्यापक अरविंद फुलझेले,कामडी सर,जांबुळकर सर,मेंडूुलकर मॅडम,ठवरे मॅडम,पेंदोर मॅडम ,यांची उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आला असून आरोग्य विभागाने पावसाळा मध्ये मुलांचे आरोग्य निरोगी राहो या करिता प्राथमिक उपआरोग्य केंद्र मासळ येथे शाळेतील श्री, धारणे सर यांनी एक दिवसीय ट्रेनिग करून शाळेतील मुलांचे आरोग्यासाठी जंतुनाशक गोळ्याचा वाटप सुध्दा मुख्यद्यपक व सर्व शिक्षक यांच्या उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!