न्याय व हक्काच्या मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी हजारोंच्या संख्येनी रस्त्यावर अंगणवाडी कर्मचारी सभेचे आयोजन विविध मागण्यांचे मूख्यमंत्र्याच्या नावे दिले निवेदन
न्याय व हक्काच्या मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी हजारोंच्या संख्येनी रस्त्यावर
अंगणवाडी कर्मचारी सभेचे आयोजन
विविध मागण्यांचे मूख्यमंत्र्याच्या नावे दिले निवेदन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - शालेय पुर्व शिक्षण व सकस आहारांची महत्वपुर्ण कर्तव्य करणाऱ्या अंगनवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्या मागील अनेक वर्षापासुन प्रलंबीतच आहेत . या मागण्यांच्या पुर्ततेकरिता चंद्रपूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र ) यांच्या वतीने रास्ता रोखो व जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले .आपल्या न्याय मागण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष इम्राण इखलाख कुरेशी यांचे नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरूण शासण विरोधी घोषणा देऊण संताप व्यक्त केला .
महाराष्ट्रराज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून तसेच त्यांच्या समस्या सोडवून न्याय देण्यात याव्या अशी रास्त मागणी घेऊन अंगणवाडी कर्मचारी सभा विविध आंदोलनाच्या माध्यमातुन लढा देत आहेत . त्याच अनुशंगाने चंद्रपूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले . हुतात्मा स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली देऊन व त्यांच्या स्मृतीच्या साक्षीने दुपारी २ .००च्या दरम्यान न्याय मागण्या संबधात सरकारच्या उदासीन वृत्तीचा निषेध करूण शासण विरोधी घोषणा देऊन चिमूर वरोरा मार्गावर रास्ता रोको करण्यात आले .
प्रलंबीत मागण्यांचे निवेदनात थकीत मानधन द्यावे , प्रधानमंत्र्यानी ११ सप्टेंबर २०१८ रोजी घोषीत केलेली मानधन वाढ द्यावी , निवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनाच्या अर्धे मानधन मिळावे , एक रक्कमी सेवा निवृत्ती वेतन त्वरीत द्यावे , अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलचे गहाळ अथवा तुट्फुट झाल्यास त्यांना भुर्दंड न करता शासणाने त्या मोबाईलचा विमा करावा . सेविका व मदतनिसांची रिक्त पदे त्वरीत भरावी , मिनि अंगणवाडीला मदतनिस देण्यात यावी . नगर पालिका क्षेत्रात प्रभागाची अट न ठेवता सेवा जेष्ठतेनुसार मदतनिसांना नियुक्त करण्यात यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या .
मूख्यमंत्री तथा महिला व बालविकास मंत्र्यांना सदर निवेदन तहसिलदार संजय नागटिळक यांचे मार्फत प्रतिनिधीक शिष्ठमंडळ देण्यात आले . शिष्ठ मंडळात जिल्हा कार्याध्यक्ष इम्राण कुरेशी , चिमूर तालुका अध्यक्ष माधुरी विर , वरोरा तालुका अध्यक्ष अन्नपूर्णा हिरादेवे , उपाध्यक्षा पुष्पा ठावरी , भद्रावती तालुका उपाध्यक्षा सांजणा बंडावार , सचिव निराशा चौधरी , सुलोचणा पडोळे , नंदा वरघने , इंदिरा आत्राम , नंदा आवारी , सुनिता भोपे , कमल वाकडे , सविता बोरकर , वैशाली ढोक , करुणा गुरणुले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या . सदर आंदोलनात चिमूर , वरोरा , भद्रावती , सिंदेवाही ,नागभिड तथा ब्रम्हपूरी येथील अंगणवाडी कर्मचारी शेकडोच्या संख्येने उपस्थित होत्या.
मासिक अहवाल व ऑनलाईन माहितीला ब्रेक
अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गर्भवती माता व तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी आहार पुरविला जातो. शिवाय इतर योजनांचाही लाभ दिला जातो. मात्र सरकाचे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचारी आक्रमक बनले आहे. दरम्यान त्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान बाल विकास प्रकल्प कार्यालय व प्रशासनाला मासिक अहवाल सादर न करणे, आॅनलाइन माहिती न भरणे तसेच शासनाला कोणतीही माहिती न देणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत.
इम्राण इखलाख कुरेशी
जिल्हा कार्याध्यक्ष , अंगणवाडी कर्मचारी सभा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!