११ ऑगस्ट रोजी चिमुरात रिपब्लिकन चळवळ या विषयावर चर्चासत्र
११ ऑगस्ट रोजी चिमुरात रिपब्लिकन चळवळ या विषयावर चर्चासत्र
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष श्रीकृष्ण उभाळे यांचे स्मृतिदिनानिमित्य बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, साप्ताहिक शालवन पत्रिकेच्या वतीने दिनांक. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे.
न्यू राष्ट्रीय विध्यालय चिमूर येथे आयोजितकचर्चासत्रात "रिपब्लिकन पक्षाला पूर्णपल्लवीत करण्याकरिता स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे यांची राजकीय दिशा" हा विषय हातळल्या जाहिल अशी माहिती मुख्य आयोजक डी के बन्सोड यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून शकरराव नगराळे यांना निमंत्रित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मलाताई उबाळे राहणार आहेत, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार मून, एड चंद्रशेखर देवतळे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी के बन्सोड, गोविंदराव ब्राम्हणकर, अजय गणवीर, साप्ताहिक संदेश बळीराज्यचे संपादक बाळासाहेब गावंडे, रघुनाथ शेळके, सिद्धार्थ सुमन, प्रशिक आनंद, पि यस डबले, साप्ताहिक पुरोगामी संदेश चे संपादक सुरेश डांगे, अशोक पाटे, संजय मोहिले, व्यंकटेश बरगे, हेमंत पाटील, काशिनाथ बन्सोड, डॉ प्रा केशव मेंढे, अशोक गोर्हे, मो. शफी सौदागर आदी उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहन्याचे आवाहन गुणवंत गेडाम, प्रेमीला बन्सोड, चित्तरंजन डेकाटे ,दिलीप जुमडे, किशोर रामटेके, कृष्णा सहारे, सुखदेव वाघमारे, घनश्याम डांगे आदींनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!