मोबाईल दुकान फोडीतील चोर अटकला पोलिसांच्या जाळ्यात आरोपीवर ३ दिवसांचा पि.सी.आर
मोबाईल दुकान फोडीतील चोर अटकला पोलिसांच्या जाळ्यात
आरोपीवर ३ दिवसांचा पि.सी.आर
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर वरोरा मुख्य मार्गावरील नेहरू चौक जवळील मोबाईल दुकान फोडून मोबाईल चोरी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अटकला असून त्यास ३ दिवसांचा पि.सी.आर. मिळाला असून पुढील चौकशी ठाणेदार स्वप्नील धुळे करीत आहे.
चिमूर येथील नेहरू चौक जवळ श्री गुरुदेव मोबाईल दुकान ची मागील आठ दिवसांपूर्वी दुकान फोडून मोबाईल व नगदी रुपयेची चोरी झाली होती तो तथाकथित चोरटा सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्यात नजर बंद झाला असता त्यात व्यवस्थित दिसत नसताना ही चिमूर पोलिसांनी गोपनीय जाळ टाकून त्याला त्यांच्या गावातील शेतात जावून पकडून अटक केली असून बोरगाव बुटी येथील विकास विठोबा घरत वय ४० वर्ष चोरट्याचे नाव असून त्याचे कडून ३ मोबाईल व नगदी रक्कम जप्त करण्यात आली असून त्यास न्यायालयात दाखल केले असता ३ दिवसांचा पि.सी.आर. मिळाला आहे. ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गायकवाड व सहकारी पोलीस तपास करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!