नवरगाव पोलिस चौकीचे पूर्ण स्टॉपची अचानक बदली

नवरगाव पोलिस चौकीचे पूर्ण स्टॉपची अचानक बदली     

          
नवरगाव (अमोल निनावे)                 
 सिंदेवाहि तालुक्यातील नवरगाव हे पंधरा हजार पेक्ष्या जास्त लोकसंख्या असणारे गाव व् त्यात अनेक आजुबाजूचे खेड़े अश्या  लोकसंखेच्या ठिकाणी एक पोलिस चौकी आहे मात्र या ठिकाणी तीनच कर्मचाऱ्या वरती पूर्ण नवरगाव व् अनेक आजुबाजूच्या खेड्याची जिमेदारी आहे. मात्र आता अचानक नविन ठानेदार श्री निशिकांत रामटेके यांनी 1/8/2019 ला या तीनही पो.हवलदार यांची बदली करुण त्यांच्या जागी नविन कर्मचारी नामे  पो.ह.बावने,श्रीरामे,वाकडे असे एकूण चार हवालदार व् एक पोलिस उपनिरीक्षक श्री पाटिल यांची नियुक्ति अचानक केलीे. यामुळे याबदली द्वारे नेमका काय उदेश आहे ठानेदार साहेबांचा यावर अनेक नवरगाव परिसरातील लोकांचा मनात वेगवेगड़े विचार निर्माण झाले आहे.या अगोदरच्या पोलिसांपेक्ष्या आताच्या नविन पोलिस टीम ला नवरगावच्या अवैध धंद्याला आळा घालन्यास यशश्वी होता येणार का,नविन काही प्रगति पर नियोजन करता येतील का याकडे नवरगाव परिसरातील लोकांचे लक्ष्य चोकीच्या नविन टीम कड़े लागले आहे.नवरगाव परिसरात नविन ठानेदार श्री रामटेके हे रुजू झाले तेव्हापासून अवैध धन्देला आळा बसवण्यात यश प्राप्त झालेला आहे.मात्र आणखी नाविण्य कल्पनेनुसार अवैध काही प्रमाणात सुरु असणाऱ्या धंदेला आळा बसवता येणार का याकडे लक्ष्य देण्यात येत आहे.यासाठी तर बदली करण्यात आली नसेलना असे अनेक विचार नवरगावच्या लोकांन् मधे पडले आहे.मात्र प्रतक्ष्यात सिंदेवाहिला अवैध धंदेला आळा अजुन फार कमी प्रमाणात बसलेला आहे असे सिंदेवाहितील लोकांचे म्हणे आहे.त्यामुळे सिंदेवाहितील अवैध धन्देला आळा बसविन्यास ठानेदार श्री रामटेके यांना यश प्राप्त करता येणार का याकडे सिंदेवाहितिल नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!