१६आगस्टला चिमूर येथे शहीद स्मृती दिन सोहळा
अमृता देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती
शहीद बालाजी रायपूरकर सभागृहासह विविध कामांचे लोकार्पण
मोटेगाव - प्रतिनिधी ( अजित सुकारे )
मोटेगाव : - भारतीय स्वातंत्र्य लढ्यात१६ आगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांती भूमीचे अमूल्य योगदान असून क्रांती लढ्याचे स्मरण करण्यासाठी १६ आगस्टला दरवर्षी शहीद स्मृती दिन सोहळा आयोजित केला जात असून यावर्षीच्या शहीद स्मृती दिन सोहळ्याच्या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती तथा दिव्यज फाउंडेशन संस्थापिका अमृता देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित राहणार आहे .
भारतीय स्वातंत्र लढ्यातील वीर हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटूंबियाचा भावपूर्ण सन्मान करणे व अखंड बलशाली भारताचे स्वप्न बाळगणारे भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रथम स्मृती दिन निमित्त अभिवादन करणे तसेच महिलांना सुरक्षा व बाध्य विचार घेऊन नारी शक्ती सन्मान महोसत्व अंतर्गत रक्षाबंधन कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे .
अमर शहिदाना विनम्र श्रद्धांजली अर्पण करणे ,स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या कुटूंबियाचा सत्कार व रक्षाबंधन कार्यक्रम चे आयोजन केले आहे .
१६ आगस्ट शहीद स्मृती दिन सोहळा निमित्ताने विविध कामांचे लोकार्पण होत असून त्यात चिमूर पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण ,सामाजिक न्याय विभाग अंतर्गत नवनिर्मिती चिमूर येथिल शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह लोकार्पण, चिमूर वडाळा पैकू येथिल शहीद बालाजी रायपूरकर भव्य सभागृहाचे लोकार्पण व महावितरण अंतर्गत नवनिर्मिती चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथिल 33 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण होणार आहे.
शहीद दिन स्मृती दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती,दिव्यज फाउंडेशन संस्थापिका अक्सीस बँक पश्चिम भारत उपाध्यक्ष तसेच समाजसेविका अमृता देवेंद्र फडणवीस, तर विशेष अतिथी खासदार अशोक नेते ,खासदार रामदास तडस आमदार रामदास आंबटकर, प्रमुख अतिथी भाजप जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, जी प अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष रेणुका दुधे, वसंत वारजूकर उपस्थित राहणार आहे .
शहीद दिन स्मृती दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार किर्तीकुमार भांगडीया , तथा भारतीय जनता पार्टी चिमुर-नागभीड यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!