लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष-पुलावर पाणी-नागरिक संतप्त
सावली (वार्ताहर)
सावली ते पांढरसराड मार्गावरील चारगाव नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. यामुळे या मार्गातील सादागड, हेटी, चारगाव, भारपायली, माणकापुर, मानकापूर, मेटेगाव, आणि पांढरसराड येथे जाण्याचा मार्ग बंद झाल्याने नागरिकात रोष निर्माण झाला आहे. चारगाव नदीवरील हा पूल नदीच्या समांतर पातळीवर असल्याने एकाच पावसात पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून या पुलाचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र या क्षेत्राचे विद्यमान आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मागणीकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका या भागातील नागरिकांना बसत आहे.
पुलावरून पाणी असल्याने या भागातील नागरिकांना सावली येथील नियमित बाजार करता आले नाही. या सोबतच मुलांना शाळेत जाणे, आरोग्याच्या सुविधा मिळण्यातही अडचण निर्माण झाली आहे.
चारगाव नदीवर उंच पूल बांधावे आणि ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे उल्लेखनिय म्हणजे या मार्गावर 80 टकरके आदिवासी समाज आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!