संरक्षण भिंत करा अन्यथा आंदोलन

संरक्षण भिंत करा अन्यथा आंदोलन - 
शिवसेनेचे महाविद्यालय प्रशासनाला अल्टिमेटम


मूल :— (अमित राऊत)
      अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या युवतीला वनविभागाकडुन आर्थिक मदत व महाविद्यालय प्रशासनाला संरक्षण भिंतीची मागणी तालुका प्रमुख शिवसेना नितीन येरोजवार यांनी आज  शिवसेनेचे शिष्टमंडळ घेऊन कर्मविर महाविद्यालयाचे प्राचार्य कराडे यांना निवेदन दिले. आठ दिवसात महाविद्यालयाला संरक्षण भिंत करण्यात आली नाही तर विद्यार्थी व विद्यार्थीनी च्या सुरक्षेसाठी आंदोलन तिव्र करण्यात येईल असे अल्टिमेटम महाविद्यालय प्रशासनाला दिले. कर्मविर महाविद्यालय 
        मुल येथे दि.30 जुलै 2019 ला निशा सोनुले ही काॅलेज मध्ये प्रसाधनगृहात गेली असता दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला केला.त्यात निशा जखमी झाली.  महाविद्यालय प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर वनविभागाने चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले व सुट्टि देण्यात आली.
      ही माहीती मिळताच मुल तालुका शिवसेना प्रमुख नितीन येरोजवार यांनी जखमी युवतीच्या केळझर येथील निवासस्थानी जाऊन आस्थेने विचारपुस केली.जखमी निशाला वनविभाग व महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत केली त्यामुळे तिला आर्थिक मदत देएयात यावी अशी मागणी केली आहे.  शिवसेनेने आज वनविभागाला आपले सिमांकन करून संरक्षण भिंत कर्मविर महाविद्यालय यांना बाधण्यास बाध्य केले नाही तर विद्यार्थीच्या संरक्षणासाठी आंदोलन करण्यात येईल
असा इशारा प्राचार्याला दिलेल्या निवेदनात मूल तालुका प्रमुख शिवसेना नितीन येरोजवार यांनी दिला आहे.  यावेळी  सुनिल काळे,महेश चौधरी ,भास्कर खोब्रागडे, संदिप चिताडे, कपिल गुरूनुले,अक्षय गजापुरे,राकेश राजुरवार ,बालु काळे  व सर्व शिवसैनिक हजर होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!