प्रशासकिय भवन मूल येथे महसूल दिन संपन्न महसुल दिनानिमित्य मूल येथे विविध कार्यक्रम संपन्न

प्रशासकिय भवन मूल येथे महसूल दिन संपन्न 
महसुल दिनानिमित्य मूल येथे विविध कार्यक्रम संपन्न 


मूल ( अमित राऊत)
   आज 1 आॅगस्ट महसूल दिनाच्या निमित्याने मूल येथिल उपविभागिय कार्यालयाच्या सभागुहात महसुल दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपविभागिय कार्यालय व तहसिल कार्यालयात उत्कृष्ठ काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशासकिय पत्र देऊन सन्मान करण्यात आला. मंचावर तहसिलदार डी.जी.जाधव, नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर, संध्याताई ठकरे,निरीक्षण अधिकारी विभावरी अबगड, उपकोषागार अधिकारी निळे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी तहसिलदार जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


    त्यात नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर, अव्वल कारकुन दिलीप गेडाम, दिनेश पुजारी, दत्तात्रय तनकुलवार, निरीक्षण अधिकारी विभावरी अबगड, मंडळ अधिकारी अनुपकुमार खोब्रागडे,तलाठी चव्हाण, शिपाई शंकर सोयाम, श्रीमती मायाबाई संगिडवार, कोतवाल गिरीधर संतोषवार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सोबतच मूल तालुक्यातील तेरा लाभाथ्र्यांना राष्ट्रीय कुंटुब लाभ योजनेच धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच विद्याथ्र्याना जातीचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व रेशन कार्ड वितरीत करण्यात आले.   
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथ्वीराज साधनकर, संचालन दिलीप गेडाम तर आभार शरद मसराम यांनी मानले.  
   तहसिल कार्यालयात कार्यरत नायब तहसिलदार संजयगांधी निराधार योजनेच्या संध्याताई ठकरे यांनी स्वेईच्छेने निवृत्ती घेतल्यामुळे त्यांचा भेटवस्तू व शालश्रीफळ देऊन निरोप देण्यात आला. 
   महसुन दिनाच्या मिमित्याने कार्यालयातील कर्मचार्‍यांना आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यासोबतच प्रशासकिय भवनाच्या परीसरात तहसिलदार जाधव व नायब तहसिलदार साधनकर याचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!