शिवनपायली ते शिरपूर रस्त्याला मंजुरी, गावकऱ्यांच्या प्रयत्नाला आले यश,
शिवनपायली ते शिरपूर रस्त्याला मंजुरी, गावकऱ्यांच्या प्रयत्नाला आले यश,
= पंचायत समिती सदस्य नर्मदा रामटेके यांनी केला पाठपुरवठा
नेरी/चिमूर :: शुभम बारसागडे
चिमूर विधानसभा क्षेत्रातील शिरपूर पंचायत समिती क्षेत्रातील शिवनपायली शिरपूर रस्त्याच्या मजबुतीकरनाला मान्यता मिळाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिमूर पंचायत समिती सदस्य नर्मदा रामटेके यांनी त्यांच्या मतदार संघातील मौजा शिवनपायली ते शिरपूर रस्त्याची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली असून कार्यकारी अभियंता, पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजना यांचेकडे दिनांक 11 डिसेंम्बर 2017 ला पत्राद्वारे मागणी केली, व सतत पत्रव्यव्हर करून स्वतः पाठपुरवठा करून मौजा शिवनपायली ते शिरपूर रस्त्याची मागणी पूर्ण झाली व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात आली, लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून त्यांच्या या कार्याचे गावात कौतुक होत आहे.
शिवनपायली या गावाची लोकसंख्या 950 असून या गावांमध्ये चौथ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद ची शाळा आहे, वर्ग 5 पासून ते पुढील शिक्षणाकरिता एकूण 200 शालेय मुले मुली नेरी तसेच चिमूर ला शिक्षण विधालय मध्ये बस नि प्रवास करतात, परंतु रस्त्यावरील खड्यामुळे चिमूर आगराची बस रस्त्याने खाल खोल करीत प्रवास करीत आहे.
बस किंवा खाजगी वाहने कधीही अपघात होऊन पलटी होऊ शकतो म्हणून या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणं करण्यासाठी पंचायत समिती सदस्य नर्मदा रामटेके यांनी स्वतः जाऊन पाटपूर्वटा केला व त्यांच्या मागणीला यश आले. आता लवकरच रस्त्याचे काम सुरु होणार असून संपूर्ण गावकर्यांनी व विद्यार्त्यांनी नर्मदा रामटेके यांचे अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!