सततधार पावसाने नवरगावात घरे जमीनदोस्त

नवरगावातील अनेक लोकांचे घरे पावसामुळे पडली,अनेक गरीब लोक घरकुलच्या प्रतीक्षेत  


नवरगाव (अमोल निनावे)
                        सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे सिंदेवाहि तालुक्यातील नवरगाव येथील अनेक गरीब लोकांचे घरे आणि गोठ्याची पड़झड़ झालेली आहे.आणि त्यामुळे आपदग्रस्त कुंटुबावर मोठे संकट कोसळले आहे.                                       अनेक वर्षापासून  हे गरीब लोक घरकुलच्या प्रतीक्षेत होते आज येणार ,उद्या येणार मात्र शेवटी त्यांच्या आशेवर पानी फेरला गेला.वास्तविक पहाता ज्या लोकांना शेती नाही रहायला धड़ जागा नाही अश्या लोकांना सरकारणी योजना निर्माण करुण घरकुल देण्याचे स्वप्न दाखविले मात्र अजूनही अश्या लोकांना घरकुल चे घरे मिडाली नाही हे शोकांतिका आहे. मात्र जे लोक स्वतःच्या घराला डबल मजली आणि टाइल्स लावू शकतात अश्या लोकांना नवरगाव मधे घरकुलचे घरे देण्यात आली आहे.       या वरुण असे लक्ष्यात येते की खरोखरच सरकारच्या योजनांची अमलबजावणी योग्य होत आहे का असे प्रश्न अनेक लोकांच्या मनात भेडसावत आहेत.अश्या परिस्थितीत आता ज्या लोकांचे घर कोसळले आहे त्यांना  अनेक समश्याचा व् नुकसानीचा सामना करावा लागत आहे.या पावसाच्या दरम्यान कवडु सोमा आत्राम्,लता माधवराव गवळी,विवेक कवळू बारापात्रे असे अनेक लोकांचे घर तर सुभानखा अखबरखा पठान यांचा गुरांचा गोठा पडल्याने मोठे नुकशान झाले आहे या लोकांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागला आहे.याची माहिती तलाठी कार्यलयाला लागताच त्यांनी पाहणी करुण पंचनामा केला असून तो वरिष्ठ अधिकारी यांना अहवाल पाठविण्यात आला आहे.तसेच ही माहिती सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेला माहिती होताच त्यांनी नुकसान ग्रस्त लोकांना त्वरित मदत देवून त्यांना या वर्षी घरकुल चे अगोदर प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे.                           सोबतच घरकुल देताना ज्याच्याकडे शेेती नाही रहायला साधा घर नाही अश्या लोकांची नवरगाव मधे चौकशी करण्यात यावी व् त्यानंतरच् घरकुल मंजूर करावे असे निवेदन सुधा देण्यात येणार आहे असे सामाजिक युवा ब्रिगेड संघठने कडून माहिती मिळालि आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!