सततधार पावसामुळे भामरागड परिसरात परत एकदा पूर

सततधार पावसामुळे भामरागड परिसरात परत एकदा पूर


भामरागड (सेवा पवार)
        भामरागड हे जिल्हा मुख्यालयापासून जवळपास १९० कि.मी अंतररावर असलेला,विकासापासून सर्व बाबतीत कोसोमय दुर मागास तालुका म्हणून परिचित आहे.अतिशय दुर्गम,डोंगराळ,जंगलव्याप्त,आदिवासी,नलक्षग्रस्त,समस्याग्रस्त,चांगल्या रस्त्याचा,कनेक्टीव्हिटीचा अभाव,निसर्ग संस्कृतीवर जीवनमान जगणारा अगदी साधा आणि प्रामाणिक लोकांचा भाग आहे.त्याचे कारणे तशीच असली तरी या भागातील लोकांना,कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच चांगलीच कसरत करावी लागते हे वास्तव आहे.


     दिनांक-३० व ३१ जुलै ला राज्यातील सर्वच भागात पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी मार्ग बंद झाले होते तर भामरागड तालुक्यात जंगल स्थितीमुळे दरवर्षी अधिकच पाऊस पडत असतो आणि या भागातील काहि पुलांची उंची कमी असल्यामुळे जमिन लेवलच्या पुलांवर पावसाचे पाणी पुलांवरुन वाहणे सहज शक्य होत असते व त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो.
      या बाबतीतील भयानक परिस्थिती भामरागड तालुक्यात  येत असते.दिनांक १ आँगष्ट ला एक दिवस पाऊसाने उसंत देऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून पडत असलेल्या सततधार पावसामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग परत एकदा बंद झाला आहे.तालुक्यातील अनेक छोटे-मोठे नदी-नाले ओसांडून वाहत आहेत.तालुक्याचा संपर्क परत एकदा जगाशी तुटला आहे.
        पहिल्या पुरामुळे जवळपास ३१४ लोकांना येथील प्रशासनाच्या वतीने व्यवस्थित स्थळी हलविण्यात आले होते.परत एकदा पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने नागरीकांमध्ये भितीचे,चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!